निर्भया बलात्कार प्रकरण : तारीख टळली; पण फाशी नाही

देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी दुसऱ्यांदा टळली (nirbhaya rape case) आहे.

निर्भया बलात्कार प्रकरण : तारीख टळली; पण फाशी नाही

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी दुसऱ्यांदा टळली (nirbhaya rape case) आहे. दिल्लीतील पटियाला कोर्टाने पुढील आदेश येईपर्यंत फाशीवर स्थगिती दिली आहे. दुसऱ्यांदा अशाप्रकारे निर्भया बलात्कारांच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) या चार आरोपींपैकी फक्त विनय शर्माची दया याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. त्यामुळे या चौघांना वेगवेगळ्या दिवशी फाशीवर लटकवले जाऊ शकते. यातील तीन आरोपी मुकेश, पवन आणि अक्षयला उद्या (1 फेब्रुवारी) फाशी होऊ शकते. पण कायद्यातील तरतुदींबाहेर न्यायालय जावू शकत नाही असे तिहार जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे एका आरोपीच्या याचिकेवर निर्णय न आल्याने इतर आरोपींना फाशी देणे ही कायद्याने चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया आरोपींचे वकील एपी सिंह यांनी दिली. सद्यस्थितीत चार आरोपींपैकी मुकेशकडे एकही पर्याय शिल्लक नाही. तर विनय, अक्षयकडे या दोघांकडे दया याचिकेचा पर्याय आहे. त्याशिवाय पवनकडे क्युरेटिव्ह आणि दया अशा दोन्ही याचिकांचे पर्याय उपलब्ध (nirbhaya rape case) आहेत. त्यामुळे जरी दोन वेळा फाशीची तारीख बदलण्यात आली असली, तरी त्यांना फाशी होणार हे नक्की आहे.

दोन वेळा स्थगिती

निर्भया बलात्कार प्रकरणाच्या 7 जानेवारीला झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने चार आरोपींविरोधात डेट वॉरंट जारी केल होतं. त्यानुसार या चौघांना 22 जानेवारीला फासावर लटकवलं जाणार होतं. दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

त्यानुसार 17 जानेवारीच्या सुनावणीदरम्यान चारही आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं. या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल, असा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला होता.

निर्भयाच्या आईला अश्रू अनावर

“दोन वेळा फाशी टळल्यानंतर निर्भयाच्या आईला प्रतिक्रिया देताना अश्रू अनावर झाले. सात वर्षांपूर्वी माझ्या मुलीसोबत हा गुन्हा घडला होता. पण सरकार पुन्हा पुन्हा आरोपींसमोर झुकत आहे. चारही आरोपींचे वकिल एपी सिंह यांनी निर्भयाच्या आरोपींची फाशी अशाचप्रकारे टळेल असे मला कोर्टात आव्हान देताना म्हटलं. मी सकाळी 10 वाजल्यापासून कोर्टात येऊन बसली आहे. जर फाशी टळणारच होती, तर मला दिवसभर या ठिकाणी का बसवून ठेवले?” असा प्रश्नही निर्भयाच्या आईने विचारला आहे.

“मी याविरोधात लढणार, सरकारला त्या आरोपींना फाशी द्यावी लागेल. अन्यथा आरोपींना दिलेली फाशीची शिक्षा ही फक्त दिशाभूल करण्यासाठी देण्यात आली होती,” असे लोअर कोर्टापासून सुप्रीम कोर्टाला सरेंडर करावं लागेल.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया

“निर्भयाच्या आरोपींची फाशी टळली हे समजल्यावर मला फार दु:ख झाले. निर्भयाचे आरोपी कायदेशीर कमतरतेचा फायदा घेत फाशीपासून बचाव करत आहेत. त्यांना ताबडतोब फासावर लटकवण्यात आलं पाहिजे. आपल्याला आपल्या कायद्यात सुधारण करण्याची फार गरज आहे. जेणेकरुन असे गुन्हे करणाऱ्यांना 6 महिन्याआधी फाशी होईल,” अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (nirbhaya rape case) दिली.

आरोपींना वेगवेगळी फाशी नाही 

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना वेगवेगळी फाशी देण्यात येणार नाही, असे सुनावणीदरम्यान वकील वृंदा ग्रोवर यांनी सांगितले आहे. नियमानुसार, कोणत्याही एका प्रकरणी दोषींना वेगवेगळी फाशी दिली जात नाही. जोपर्यंत सर्व दोषींच्या याचिकांवर सुनावणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही आरोपींना फाशी दिली जात नाही.

वकील वृंदा ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1981 मधील एका प्रकरणात 3 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणी 2 आरोपींनी राष्ट्रपतींकडे दया याचिकेची मागणी केली होती. त्यावेळी राष्ट्रपतींनी त्या दोन आरोपींना माफ केलं होतं. मात्र या प्रकरणातील एका आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली होती आणि त्यानंतर त्या आरोपीला फाशी देण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने कोणत्याही प्रकरणातील दोषींना एकत्र फाशी देण्यात येईल, असे स्पष्ट केलं (nirbhaya rape case) होतं.

फाशीच्या काही तासांपूर्वी पवन गुप्ताची सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका

निर्भया प्रकरणातील आरोपी अक्षय ठाकूरची दया याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर आता आरोपी पवन गुपताने फाशीच्या काही तासांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुन्ह्यावेळी अल्पवयीन असल्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं होतं, पवन गुप्ताने या निर्णयावर पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. तसेच, डेथ वॉरंटला रद्द करण्याची मागणीही केली आहे. यापूर्वी 20 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पवन गुप्ताच्या याचिकेला फेटाळलं.

निर्भया बलात्कार प्रकरण

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली (nirbhaya rape case) होती.