निर्भया प्रकरण : भिंतीवर डोकं आपटून दोषी विनय जखमी, पुन्हा फाशी टळण्याची भीती

आरोपी विनय याने स्वत:ला जखमी करुन घेतलं आहे. तुरुंगात असलेल्या विनयने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटून स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

निर्भया प्रकरण : भिंतीवर डोकं आपटून दोषी विनय जखमी, पुन्हा फाशी टळण्याची भीती
Follow us
| Updated on: Feb 20, 2020 | 12:47 PM

नवी दिल्ली : निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी (Nirbhaya Gang Rape Case) आरोपींना फासावर लटकवण्यासाठी नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आला. न्यायालयाने फाशीसाठी 3 मार्च या तारखेवर मोहर लावली. दरम्यान, निर्भयाचे आरोपी फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी शक्य त्या सर्व युक्त्या वापरत आहेत (Nirbhaya Gang Rape Case). आता आरोपी विनय याने स्वत:ला जखमी करुन घेतलं आहे. तुरुंगात असलेल्या विनयने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटून स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न केला (Accused Vinay Kumar Injured).

2012 च्या दिल्ली गँगरेपचा आरोपी विनयने स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न केला. विनय कुमारने स्वत:चं डोकं भिंतीवर आपटलं. ही घटना 16 फेब्रुवारीला घडली. या घटनेत विनयला काही किरकोळ जखमाही झाल्या आहेत, अशी मीहिती तिहार जेलच्या अधिकाऱ्य़ांनी दिली.

नवीन डेथ वॉरंट जारी झाल्यापासून विनयचं मनस्वास्थ्य बिघडलं आहे. त्याने त्याच्या आईलाही ओळखलं नाही, असं विनयचे वकील ए.पी. सिंग यांचं म्हणणं आहे. मात्र, जेलमधील अधिकाऱ्यांच्या मते विनयची प्रकृती अगदी व्यवस्थित आहे.

पुन्हा फाशी टळण्याची शक्यता

फाशीची शिक्षा झालेले आरोपी अनेकदा हिंसक वर्तन करु लागतात. अशा परिस्थितीत जर आरोपीला कुठली इजा झाली तर काही काळासाठी फाशी टाळता येते. जर आरोपी जखमी झाला. त्याचं वजन कमी झालं, तर त्याची प्रकृती स्थिर होईपर्यंत फाशी टाळता येते, अशी माहिती जेल अधिकाऱ्यांनी दिली.

निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना येत्या 3 मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार आहे. नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी आरोपी मुकेश कुमार सिंह (वय-32), पवन गुप्ता (वय-25), विनय कुमार शर्मा (वय-26) आणि अक्षय कुमार (वय-31) यांना फाशी होणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.