AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाणेरडे चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर, निती आयोगाच्या सदस्यांचा जावईशोध

मागील अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. इंटरनेटवरही या ठिकाणी बंदी होती. मात्र, हळूहळू काही प्रमाणात इंटरनेटची सुविधा सुरु होत आहे (Internet ban in Kashmir).

घाणेरडे चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर, निती आयोगाच्या सदस्यांचा जावईशोध
| Updated on: Jan 19, 2020 | 12:04 PM
Share

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. इंटरनेटवरही या ठिकाणी बंदी होती. मात्र, हळूहळू काही प्रमाणात इंटरनेटची सुविधा सुरु होत आहे (Internet ban in Kashmir). यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी जम्मू-काश्मीरमध्ये “घाणेरडे चित्रपट” पाहण्यासाठी इंटरनेटचा वापर होत असल्याचा जावईशोध लावला आहे (Internet ban in Kashmir).

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीमुळे एकीकडे जम्मू काश्मीरमधील अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी अडथळे येत आहेत. माध्यमांनाही माहितीची देवाणघेवाण करण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाईन आर्थिक व्यवहारही करणे बंद आहे. असं असताना सारस्वत यांच्या या विधानाने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यात सारस्वत यांच्या विधानावर टीका होत आहे.

व्ही. के. सारस्वत धीरूभाई अंबानी इंस्टीट्यूट ऑफ इंफॉर्मेशन अँड कम्यूनिकेशन टॅक्नॉलॉजीच्या (DA-IICT) वार्षिक दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. ते म्हणाले, ‘जम्मू काश्मीरमध्ये सोशल मीडियाचा उपयोग करुन समाजात आग लावली जाते. तेथे इंटरनेट नसेल तर काय फरक पडतो? तसंही ते इंटरनेटचा उपयोग करुन तेथे काय पाहतात? तेथे घाणेरडे चित्रपट पाहतात, त्याशिवाय काहीही करत नाही.’

ज्या नेत्यांना जम्मू काश्मीरमध्ये जायचं आहे त्यांना तेथे का जायचं आहे? त्यांना दिल्लीतील रस्त्यावर जसं आंदोलन सुरु आहे तसंच काश्मीरमध्येही करायचं आहे, असाही आरोप सारस्वत यांनी केला.

काश्मीरमध्ये अंशतः इंटरनेट सुरु

जम्मू काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील इंटरनेट अंशतः सुरु केल्यानंतर जवळपास 150 वेबसाईटला व्हाईट लिस्टमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांना या 150 वेबसाईटचा उपयोग करता येणार आहे. सरकारी विभागांच्या वेबसाईट, बँकांच्या अधिकृत वेबसाईट, जीमेल, याहूसारख्या मेसेज वेबसाईटचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्सलाही यात सूट देण्यात आली आहे.

काश्मीरमध्ये सुरु झालेल्या काही प्रमुख वेबसाईट

https://www.google.com/gmail https://in.mail.yahoo.com https://mail.rediff.com https://outlook.live.com http://www.rbi.org.in https://www.Hdfc.com https://www.Jkbankonline.com https://www.icicibank.com https://www.axisbank.com https://www.pnbindia.in http://www.wikipedia.org http://kashmiruniversity.net http://jammuuniversity.in http://jkpsc.nic.in http://jkssb.nic.in http://www.ignou.ac.in http://www.jkpolice.gov.in http://www.passportindia.gov.in http://www.incometaxindiaefiling.gov.in http://www.services.GST.GOV.IN Netflix Amazon Prime

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.