Bihar Election | मत द्यायचे नसेल तर नका देऊ, लालूप्रसादांच्या जयघोषामुळे नितीश कुमार भडकले

लालूप्रसाद यादव यांच्या जयघोषामुळे संतप्त झालेल्या नितीशकुमारांनी आम्हाला मत द्यायचे नसेल तर नका देऊ, अशा शब्दात घोषणा देणाऱ्यांना खडसावले. (Nitish Kumar angry after slogans of Lalu Prasad Yadav in rally of JDU)

Bihar Election | मत द्यायचे नसेल तर नका देऊ, लालूप्रसादांच्या जयघोषामुळे नितीश कुमार भडकले

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सभेत लालूप्रसाद यादव यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. लालूप्रसाद यादव यांच्या जयघोषामुळे संतप्त झालेल्या नितीशकुमारांनी आम्हाला मत द्यायचे नसेल तर नका देऊ, अशा शब्दात घोषणा देणाऱ्यांना खडसावले. (Nitish Kumar angry after slogans of Lalu Prasad Yadav in rally of JDU)

मुख्यमंत्री नितीशकुमार परसा विधानसभा मतदारसंघातील डेरनी मैदानाला सभेला संबोधित करत होते. माजी मंत्री तेज प्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये ही घटना घडली. राजदचे संस्थापक लालू प्रसाद यादव यांच्या जयघोषामुळे नितीशकुमार संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

नितीशकुमारांनी यांनतर घोषणाबाजी करणाऱ्यांवर टीका केली. ज्यांना काम करण्याचा अनुभव नाही ते लोक अशा प्रकारच्या घोषणा देतात. गेल्या 15 वर्षात आम्ही बिहारमधील गुन्हेगारी संपवली आणि राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन गेलो. 15 वर्षापूर्वी काय स्थिती होती आणि आता काय स्थिती आहे ते तुम्ही पाहात,असे नितीशकुमार यांनी म्हटले.

जे लोक काम करतात त्यांच्याकडून लोक अपेक्षा ठेवताता. 15 वर्षांमध्ये विकासकामे केली. आरोग्य, शिक्षण, वीज आणि पाणी यासह सर्व क्षेत्रांमध्ये काम केले. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारली आहे. अजून एक संधी दिली तर राज्यातील विकासाची स्थिती सुधारेल, असं नितीशकुमार म्हणाले.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होणार असून पहिल्या टप्प्यामध्ये 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या:

काँग्रेसला बिहार निवडणुका संपण्याची प्रतीक्षा, मोठ्या बदलाचे संकेत

बिहार विधानसभा निवडणुकीतील तीन कट्टर विरोधक एकत्र! काय आहे कारण?

(Nitish Kumar angry after slogans of Lalu Prasad Yadav in rally of JDU)

Published On - 7:10 pm, Wed, 21 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI