काँग्रेसला बिहार निवडणुका संपण्याची प्रतीक्षा, मोठ्या बदलाचे संकेत

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी बिहार निवडणुकांनंतर तात्काळ संघटनात्मक बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

काँग्रेसला बिहार निवडणुका संपण्याची प्रतीक्षा, मोठ्या बदलाचे संकेत

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सप्टेंबर महिन्यात काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादानंतर आता पक्षात मोठे बदल होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी बिहार निवडणुकांनंतर तात्काळ संघटनात्मक बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी सोनिया गांधी यांनी 5 सदस्यांची टीम तयार केली असून ही टीम रोजचं काम आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाची (Central Election Authority) पुन्हा स्थापना करण्यात मदत करणार आहे. (congress party may reshuffle after bihar elections)

लवकरच भरल्या जातील रिक्त जागा
सप्टेंबरमध्ये पक्षाच्या अध्यक्षांनी काँग्रेस कार्यकारी समितीत (Congress Working Committee) मोठे बदल केले होते. ज्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना सरचिटणीस पदावरून काढून टाकण्यात आलं होतं. हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन राज्यात प्रभारीची पदे रिक्त आहेत. यानुसार, दिल्ली आणि गोवा या दोन राज्यांमध्ये नवीन प्रभारी नियुक्त करण्याची शक्यता आहे. सध्या बिहारचे शक्तीसिंह गोहिल (Shaktisinh Gohil) आणि दिल्लीचे प्रभारी आहेत तर दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांच्याकडे तामिळनाडू, पुडुचेरी आणि गोवा प्रभारीपद देण्यात आलं आहे.

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे शेतकरी सेलचे प्रमुख नाना पटोले (Nana Patole) हे महाराष्ट्र विधानसभेचे सभापती आहेत. ओबीसी विभागाचे अध्यक्ष ताम्रध्वज साहू हे छत्तीसगडचे गृहमंत्री आहेत. याव्यतिरिक्त नितीन राऊत हे महाराष्ट्र सरकारचे ऊर्जामंत्री असून अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख आहेत. रणदीपसिंग सुरजेवाला हे सरचिटणीस असून ते पक्षाच्या संप्रेषण विभागाचे अध्यक्षदेखील असून त्यांना कर्नाटकचा कार्यभार देखील देण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व रिक्त जागा लवकरच भरल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे. (congress party may reshuffle after bihar elections)

कोण असणार सोनिया गांधींचे सहाय्यक?
पक्षाच्या संघटनाच्या कामासाठी सोनिया यांच्यासोबत काही सहाय्यकांची यादी जारी करण्यात आली आहेय यामध्ये एके एके अँटनी (AK Antony), अहमद पटेल (Ahmed Patel), अंबिका सोनी (Ambika Soni), केसी वेणुगोपाल (KC Venugopal), मुकुल वासनिक (Mukul Wasnik) आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या नावाचा समावेश आहे.

Gold Rate: सोनं महागलं, ऐन सणासुदीत चांदीही वधारली; पाहा आजचे दर

आगामी निवडणुकांमध्ये ‘या’ राज्यांवर असणार लक्ष
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या पक्षाचा विस्तार आणखी मजबूत करण्यासाठी काँग्रेसने मोठा प्लान आखला आहे. यासाठी ते काही महत्त्वाच्या राज्यांना टार्गेटवर ठेवणार आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

(congress party may reshuffle after bihar elections)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *