तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात

| Updated on: Jul 20, 2020 | 9:34 PM

नागपूर महानगपालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला (NMC Commissioner Tukaram Mundhe Action Mode) मिळत आहे.

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात
Follow us on

नागपूर : नागपूर महानगपालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला (NMC Commissioner Tukaram Mundhe Action Mode) मिळत आहे. तुकाराम मुंढे यांनी बाजारपेठेत नियम मोडणाऱ्या दुकानांवर कारवाई केली आहे. तसेच पीपीई कीट घालून रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावाही घेतला.

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज स्वत: बाजारपेठेतील नियम मोडणाऱ्या दुकानांवर कारवाई केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्यानंतर पीपीई कीट घालून ते कोरोना रुग्णांच्या वॉर्डाची पाहणी केली. यानंतर कोरोना रुग्णांची विचारपूस केली.

हेही वाचा – मिशन सतरंजीपुरा, हॉटस्पॉटमुक्त करण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘मास्टर प्लॅन’

त्याशिवाय नागपूर कोरोनामुक्त व्हावं यासाठी तुकाराम मुंढे यांनी मास्टर प्लॅन तयार केला होता. नागपूरमधील सतरंजीपुरा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट कोरोना ठरला होता. यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त मुंढे यांनी सतरंजीपुरामधील जवळपास 1700 लोकांना क्वारंटाईन केलं आहे. तसेच या परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे 200 जवान तैनात केले आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या मास्टर प्लॅनमधील उपाय योजना

  • सतरंजीपुरामधील 1700 च्या जवळ लोकांना करण्यात आलं क्वारंटाईन
  • टीबी पेशंट शोधून त्यांच्यावर उपचार
  • गरोदर मातांची तपासणी
  • हाय रिस्क असणाऱ्यांची कडक तपासणी केली जात आहे
  • सतरंजीपुरा परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे 200 जवान तैनात

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

लॉकडाऊनमध्ये नालेसफाईचे काम

दरम्यान याआधी नागपुरात पावसाचे पाणी जमा होऊ नये, त्याचा सहजतेने निचरा व्हावा यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाले सफाईंच्या कामाचे आदेश दिले होते. या निर्देशानुसार पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात एवढया मोठया प्रमाणात नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार 10 झोनमधील रस्त्यालगत 582.84 किमीपैकी आतापर्यंत 537.17 किमी पावसाळी नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. तर उर्वरित 45.67 किमीची सफाई सुरु केली आहे. येत्या काही दिवसात ती पूर्ण होणार आहे.

नागपूर शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांच्या बाजूला, फुटपाथलगत असलेल्या नाले बुजलेल्या स्थितीत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे नागपुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. लॉकडाऊनमुळे फुटपाथ आणि रस्तेही मोकळे असल्याने याचा स्वच्छतेसाठी फायदेशीर (NMC Commissioner Tukaram Mundhe Action Mode) ठरले.

संबंधित बातम्या : 

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार, नितीन गडकरींचे पत्र

तुकाराम मुंढेंवर 20 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, महापौरांकडून पोलिसात तक्रार दाखल