मिशन सतरंजीपुरा, हॉटस्पॉटमुक्त करण्यासाठी तुकाराम मुंढेंचा 'मास्टर प्लॅन'

नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे (Action plan for Corona free Nagpur ).

मिशन सतरंजीपुरा, हॉटस्पॉटमुक्त करण्यासाठी तुकाराम मुंढेंचा 'मास्टर प्लॅन'

नागपूर : राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. त्यात नागपूरचा सतरंजीपुरा मुख्य हॉटस्पॉट आहे. मात्र, आता याच नागपूरला कोरोनामुक्त करण्यासाठी नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे (Action plan for Corona free Nagpur ). नागपूरमधील सतरंजीपुरा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट कोरोना ठरला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त मुंढे यांनी सतरंजीपुरामधील जवळपास 1700 लोकांना क्वारंटाईन केलं आहे. तसेच या परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे 200 जवान तैनात केले आहेत.

नागपुरातील सतरंजीपुरा भागाची ओळख सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणूनच होत आहे. या भागातील 68 वर्षीय वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या व्यक्तीच्या संपर्कात जवळपास 200 नागरिक आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याचं पाहायला मिळालं. आतापर्यंत एकट्या सतरंजी पुरा भागात 87 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. संपूर्ण नागपूरात 138 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सतरंजीपुरा भागातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले नाही. त्यामुळे इथे मोठा संसर्ग झाला असाही आरोप होत आहे.

तुकाराम मुंढे यांच्या मास्टर प्लॅनमधील उपाय योजना

  • सतरंजीपुरामधील 1700 च्या जवळ लोकांना करण्यात आलं क्वारंटाईन
  • टीबी पेशंट शोधून त्यांच्यावर उपचार
  • गरोदर मातांची तपासणी
  • हाय रिस्क असणाऱ्यांची कडक तपासणी केली जात आहे
  • सतरंजीपुरा परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे 200 जवान तैनात

सतरंजीपुरा हा भाग दाटीवाटीचा आणि मोठ्या लोकसंख्येचा भाग आहे. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेल्या मास्टर प्लॅननुसार या भागाला सील करत नागरिकांना क्वारंटाईन करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या भागातील 1700 पेक्षा जास्त लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सर्व नागरिकांचे स्क्रिनिंग केले जात आहे. टीबी पेशंट, गरोदर माता यांची तपासणी केली जात आहे. हाय रिस्क लोकांची कसून तपासणी केली जात असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे.

या संपूर्ण मास्टर प्लॅननुसार कामाला सुरुवात झाली आहे. हा भाग कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण ताकद लावली आहे. तुकाराम मुंढे त्यांच्या शिस्तप्रियतेसाठी आणि नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. त्यामुळे याचा नागपुरात लवकरच परिणाम होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे याचा अंतिम परिणाम येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या :

मालेगाव मनपा आयुक्तांचा दणका, पदभार स्वीकारताच 33 कामचुकार कर्मचाऱ्यांवर गुन्हा

तुझ्यामुळे कोरोना होईल, तू हॉस्पिटलला जाऊ नको, बार्शीत वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण

कोरोनामुक्त नर्स आणि पतीचे जंगी स्वागत भोवलं, पिंपरीत नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा

पुण्यात शुक्रवार ठरला घातवार, 24 तासात सात रुग्ण दगावले, बळींचा आकडा शंभरीच्या उंबरठ्यावर

Corona Live Update | भारतीय लष्कराची महत्त्वाची पत्रकार परिषद, तिन्ही दलप्रमुख संवाद साधणार

Action plan for Corona free Nagpur

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *