इजिप्त, तुर्की आणि थायलंडहून कांद्याचे कंटेनर दाखल, कांद्याचे दर….
कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात (Onion export vashi market) करण्यात आली असून, कांद्याचे 130 कंटेनर सध्या जेएनपीटी बंदरात आले आहेत.

नवी मुंबई : कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात (Onion export vashi market) करण्यात आली असून, कांद्याचे 130 कंटेनर सध्या जेएनपीटी बंदरात आले आहेत. त्यातील इजिप्त ,तुर्की ,थायलंडहून आलेले कांद्याचे 4 कंटेनर मुंबई एपीएमसी बाजारात आला आहे. इजिप्त आणि थायलंडच्या कांद्याची किंमत प्रति किलो 50 ते 80 रुपये विकला जात आहे, तर महाराष्ट्र आणि गुजरातचा कांदा 60 ते 80 रुपये किलोने (Onion export vashi market) विकला जात आहे.
परदेशातून आलेल्या कांदा आणि महाराष्ट्रातील कांद्याचा सरासरी भाव एकच दिसून येत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आणि व्यापारी परदेशातून कांद्याची आयात करण्याची गरज काय, असा सवाल विचारत आहेत.
परदेशातून कांदा आपल्याकडे येणे हे काही आता नवीन राहिलेले नाही. यापूर्वीही अनेकदा बाजारात इजिप्त, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या ठिकाणाहून कांद्याची आवक झाली आहे. त्यामुळे परदेशातील कांदा कसा आहे, हे आता अनेक व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांना कळून चुकले आहे.
परदेशातील कांद्याला आपल्या कांद्याची सर नाही. आपल्या कांद्यात असलेला तिखटपणा आणि चव अन्य ठिकाणच्या कांद्याला नाही. त्यामुळे इतर कुठल्याही ठिकाणांहून कांदे आले तरी त्यांना महाराष्ट्रातील कांद्याची सर येत नाही. त्यामुळे आपल्याकडील ग्राहकांना इतर ठिकाणचे कांदे पसंती देत नाहीत.
अशा परिस्थितीमुळे आत्ता आलेल्या या परदेशी कांद्यांना बाजारात उठाव दिसून येत आहे. आता आपल्याकडील चांगला कांदा 60 ते 80 रुपये किलोमध्ये मिळत आहे. तर, हा परदेशी कांदा 70 ते 80 रु. किलोने उपलब्ध आहे. दरामध्ये समान भाव आहे.
शुक्रवारी घाऊक बाजारात आपल्या कांद्याला 40 ते 80 रु. किलोचा दर मिळाला असून कांद्याच्या 115 गाड्यांची आवक झाली आहे. मात्र तरीदेखील कांद्याला हवा तसा उठाव मिळाला नसल्याचे व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.