मराठा आरक्षण : आम्ही सरकारसोबत, कुठलंही राजकारण आणणार नाही : फडणवीस

आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही, असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले (Devendra Fadanvis on Maratha Reservation).

मराठा आरक्षण : आम्ही सरकारसोबत, कुठलंही राजकारण आणणार नाही : फडणवीस

मुंबई : “आम्ही सरकारसोबत आहोत, यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही,” असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितले (Devendra Fadanvis on Maratha Reservation). नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली (Devendra Fadanvis on Maratha Reservation).

“मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार सध्या तीन पर्यायाने विचार करत आहे. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतोय. आम्ही सरकारबरोबर आहोत, यात कुठलंही राजकारण आणणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“सरकार घटनापीठाकडे जाणार आहे तर त्याला पाठिंबा देऊ. सरकारने मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे. जागा वाढवल्या, तर मराठा विद्यार्थींना न्याय मिळेल. या जागांवरील विद्यार्थ्यांची फी सरकारने प्रतिपूर्ती करावी”, असंही फडणवीसांनी सांगितले.

“सोमवार, मंगळवारपर्यंत ड्राफ्ट तयार करुन तो मुख्य न्यायमूर्तींकडे पाठवायचा आहे. या कायद्याला स्थगिती देता येत नाही, मग त्याठिकाणी आपण कमी पडलो का ? असेही ते यावेळी म्हणाले तसेच पुन्हा घटनापीठाकडे सर्व तयारीनिशी जाऊ. मराठा आरक्षण कसं बहाल करता येईल, त्यासाठी प्रयत्न करु असं आम्ही सरकारला सांगितलं आहे”, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष नेत्यांनी मला वचनं दिलं आहे. पुढच्या न्यायालयीन लढाईवर चर्चा झाली. न्यायालयीन लढाई संपेपर्यंत काय दिलासा द्यायचा, त्यावरही या बैठकीत चर्चा झाली. “सर्वोच्च न्यायलयातील याचिका घटनापीठाकडे पाठवताना अनपेक्षितपणे आरक्षणाला स्थगिती दिली. आज विरोधी पक्षनेत्यांनी आपण सरकारसोबत आहोत असं आश्वासन दिलं आहे. यात कोणतंही राजकारण नाही. सर्व पक्ष एकत्र आहेत,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं, उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवू नयेत, छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On - 9:39 pm, Wed, 16 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI