लोकसभेत बांगलादेशी, रोहिंग्याच्या मदतीने विरोधकांनी जागा जिंकल्या, किरीट सोमैय्या यांचा आरोप
साल १९६० मध्ये जो कायदा आला होता. त्यामध्ये अनेक भारतीयांकडे जन्म प्रमाणपत्र नव्हते म्हणून ते न्यायालयांकडे हे प्रकरण सोपविण्यात आले होते. नंतर त्यात सुधारणा होऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे. यात एक वर्षापेक्षा जास्त जुन्या केसेस असेल तर पुरावे द्यावे लागतात.

विधानसभा आचार संहिता असताना व्होट जिहाद अंतर्गत उद्धव ठाकरे सेना, एमआयएम, काही मुस्लिम संस्था आणि बांग्लादेश यांनी मोठा गेम प्लान तयार केला होता. जुलैनंतर ठिकठिकाणी आचारसंहितेचा काळ असताना लोकसभा निवडणूकांत यांचा विजय झाला होता. म्हणून त्यांचे सरकार येणार असे पसरवले जात होते. त्या चार-पाच महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी रोहिंग्यानी अर्ज केला. त्यांना उशीरा जन्मप्रमाणपत्र देण्यात आले आहे असा सनसनाटी आरोप भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
आतापर्यंत एक लाख ७ हजार लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर ९० हजार अर्ज प्रलंबित आहेत. आपण मालेगावमध्ये गेलो होतो तेव्हा ही बाब पुढे आली, दोन लाख बांगलादेशींना भारतीय बनवण्याचे कारस्थान उघड झालं आहे. मालेगावचे नायब तहसीलदार यांना सस्पेंड करण्यात आले आहे. उशीराने जन्म प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आता थांबवण्यात आली आहे.आणि ज्या एक लाख लोकांना प्रमाणपत्र दिले आहे त्यांचे चौकशी केली जाणार आहे असेही किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे.
हे दोन लाख हजार अर्ज जेथून आले आहेत त्या ३७ तालुक्यात जाऊन आलो किंवा माहिती मिळवली. त्यात ९९% रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि हे कटकारस्थान मालेगावमध्ये सुरू झाले आहे. एटीएसला या कामाची चौकशी करण्यास सुचविले आहे. दोन लाख प्रमाणपत्राचं काम थांबवणे. चौकशी होऊन बांगलादेशी यांना परत बांगलादेशला पाठवविले जाणार आणि हा गेम प्लान करणाऱ्यांकडे मालेगावमध्ये जो बँक घोटाळा झाला होता त्यातून हे पैसे आले आहेत असा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. काल मालेगाव तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना सस्पेंड करण्यात आले. आणखीन काही ठिकाणी ही कारवाई होणार आहे. एका बाजूला अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे आणि दुसरीकडे अनधिकृत नागरिकांना बांगलादेशात परत पाठवायचे आहे आणि तसेच यापुढे प्रमाणपत्रं देताना व्यवस्थित लक्ष ठेवणे गरजेचे आहे.




अशी वाटली जन्मप्रमाणपत्रं
यवतमाळला साडेतेरा हजार लोकांना जन्मप्रमाणपत्र देण्यात आले अमरावतीला १५००० लोकांना देण्यात आले आहे. अकोल्याला १५ हजार लोकांना दिले आहे, अकोला शहरात साडेचार हजार लोकांना दिले आहे. अंजनगाव सुर्जीमध्ये १४०० लोकांना दिले आहे. त्यात सर्वच्या सर्व बांगलादेशी मुस्लीम आहेत. हा खूप मोठा गेम प्लान आहे त्यामुळे आता नवीन प्रक्रिया थांबवली आहे असेही किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे.