हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना, सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

SIT पथकाला बलात्कार प्रकरणाचा तपास करुन, आठ दिवसात अहवाल सादर करावा लागणार आहे. (order of Establishment of SIT)

prajwal dhage

|

Sep 30, 2020 | 6:04 PM

लखनऊ : हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT (Special Investigation Team) ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला बलात्कार प्रकरणाचा तपास करुन, सात दिवसात अहवाल सादर करावा लागणार आहे. तसे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. (order of Establishment of SIT for investigation of Hathras gang rape case by Yogi Adityanath)

हाथर सयेथील बलात्कार पीडित तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात असंतोष निर्माण झाला. बलात्कार प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. नागरिकांमधील असंतोष आणि बलात्कार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता योगी आदित्यनाथ यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पथकाला बलात्कार प्रकरणाचा पूर्ण तपास करुन आपला अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करावा लागणार आहे. तसे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

उत्तर प्रदेशचे गृह सचिव भगवान स्वरुप यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात डीआयजी चंद्रप्रकाश आणि आयपीएस पूनम यांच्यासह एकूण तीन सदस्य असतील. या पथकाला आपला अहवास सात दिवसांच्या सादर करण्याचे आदेश आहेत. तशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये दिली आहे. तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कुठलीही दया न करता बाजू प्रभावीपणे मांडण्याचेही आश्वासन त्यांनी दिले आहे.

दरम्यान, पीडित तरुणीवर मंगळवारी (29 सप्टेंबरला) रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.कुटुंबियांनी तरुणीच्या अंत्यसंस्काराला विरोध केला होता. आमच्या इच्छेविरुद्ध पोलिसांनी अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. तर, पीडितेच्या कुटुंबीयांचे आरोप फेटाळून लावले आहेत. कुटुंबियांच्या परवानगीनंतरच पीडितेवर अंत्यसंस्कार केले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

Hathras Gang-Rape | पोलिसांकडून पीडित मुलीवर गुपचूप अंत्यसंस्कार, कुटुंबाचा दावा, लेकीचा चेहरा पाहण्यासाठी आक्रोश

उत्तर प्रदेशात 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, उपचारादरम्यान मृत्यू

नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक

(order of Establishment of SIT for investigation of Hathras gang rape case by Yogi Adityanath)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें