AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होय, आम्ही ‘जैश’ला भारतात हल्ले करायला लावले: मुशर्रफ

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनी गौप्यस्फोट केला आहे. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात सरकारच्या सांगण्यावरुन जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरने भारतात बॉम्बस्फोट केले होते, अशी कबुली मुशर्रफ यांनी दिली. पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिकला टेलिफोन मुलाखतीत त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली. शिवाय त्यांनी जैश ए मोहम्मदवरील कारवाई योग्य असल्याचं म्हटलं. याच […]

होय, आम्ही 'जैश'ला भारतात हल्ले करायला लावले: मुशर्रफ
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनी गौप्यस्फोट केला आहे. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात सरकारच्या सांगण्यावरुन जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरने भारतात बॉम्बस्फोट केले होते, अशी कबुली मुशर्रफ यांनी दिली. पाकिस्तानी पत्रकार नदीम मलिकला टेलिफोन मुलाखतीत त्यांनी ही खळबळजनक माहिती दिली. शिवाय त्यांनी जैश ए मोहम्मदवरील कारवाई योग्य असल्याचं म्हटलं. याच संघटनेने माझ्या हत्येचाही प्रयत्न केला होता, असाही दावा मुशर्रफ यांनी केला.

मी नेहमीच जैश ए मोहम्मद या संघटनेला दहशतवादी संघटनाच संबोधत आलो आहे. त्यांनी माझ्यावरही हल्ला केला होता. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मला आनंद आहे की सरकार या संघटनेविरोधात कडक कारवाई करत आहे. पण ही कारवाई आधीच व्हायला हवी होती, असं मुशर्रफ म्हणाले.

डिसेंबर 2003 मध्ये पाकिस्तानमध्ये मुशर्रफ यांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदने हल्ला केला होता. त्यावेळी त्यांनी जैशवर दोनवेळा बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता.

आम्ही तिकडे स्फोट करत होतो

मुशर्रफ यांनी स्वत: बंदी का आणली नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर मुशर्रफ म्हणाले, “त्यावेळी परिस्थिती ठिक नव्हती. त्यावेळी यामध्ये आमचे गुप्तचर आयएसआयवाले सहभागी होते, त्यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये जशास तसं ही भूमिका घेतली जात होती. ते पाकिस्तानात स्फोट घडवत होते, आम्ही तिकडे करत होतो”

सध्या यूएईमध्ये वास्तव्य

परवेझ मुशर्रफ यांनी 1999 मध्ये सत्तापालट करुन पाकिस्तानची सूत्रं हाती घेतली होती. तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांना बेदखल करुन ते राष्ट्रपती झाले होते. 9 वर्षे त्यांनी सत्ता उपभोगली. त्यानंतर ते यूएईला रवाना झाले, सध्या ते तिथेच राहतात.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!