AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Palghar Mob Lynching | पालघर साधू हत्याकांड प्रकरणी अटकेतील 53 जणांना जामीन

एप्रिल महिन्यात गडचिंचले गावात जमावाने केलेल्या हल्ल्यात दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता

Palghar Mob Lynching | पालघर साधू हत्याकांड प्रकरणी अटकेतील 53 जणांना जामीन
| Updated on: Nov 26, 2020 | 5:36 PM
Share

ठाणे : पालघरमधील साधू हत्याकांड (गडचिंचले झुंडबळी) प्रकरणात अटक झालेल्या 53 जणांना ठाण्यातील विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. एप्रिल महिन्यात पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. (Palghar mob lynching case special court in Thane granted bail to 53 persons arrested)

पालघरमध्ये जमावाने केलेल्या दोन साधूंसह तिघांच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारकडून गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. त्यामध्ये राज्य सरकारने या प्रकरणात पोलिसांवर काय कारवाई केली याची माहिती दिली होती.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 15 पोलिसांच्या पगारामध्ये कपात करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले आहे, तर दोन जणांना सेवा निवृत्तीवर पाठवले आहे.

काय आहे प्रकरण?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. (Palghar mob lynching case special court in Thane granted bail to 53 persons arrested)

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत 101 जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले

संबंधित बातम्या :

पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडी

Palghar Mob Lynching | गडचिंचले झुंडबळी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

(Palghar mob lynching case special court in Thane granted bail to 53 persons arrested)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...