Palghar Mob Lynching | गडचिंचले झुंडबळी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

गंडचिंचले झुंडबळी प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने डहाणू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

Palghar Mob Lynching | गडचिंचले झुंडबळी प्रकरणी दोषारोपपत्र दाखल
Follow us
| Updated on: Jul 16, 2020 | 7:08 PM

पालघर : गंडचिंचले झुंडबळी प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (Palghar Mob Lynching Case) डहाणू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे जमावाने दोन साधू आणि त्याच्या चालकांची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने तपास पूर्ण केला आहे (Palghar Mob Lynching Case).

याप्रकरणी पालघर येथे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने तीनही गुन्ह्याचा तपास आपल्याकडे घेतला. या गुन्ह्यांचा तपास कोकण भवन पथकाकडे सोपवण्यात आला होता.

तपास पथकाने कोव्हिड-19 च्या कठीण काळातही आरोपींच्या वास्तव्याबाबतची गोपनीय माहिती प्राप्त करणे, घरझडती, गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार जप्त करते इत्यादी महत्वाची कामं केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने एकूण 808 संशयित आणि 108 साक्षीदार असे पुरावे गोळा केले आहे. त्यानुसार, 154 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी कोणालाही आजपर्यंत जामिन मंजुर झालेला नाही (Palghar Mob Lynching Case).

काय आहे पालघर झुंडबळी प्रकरण?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी 16 एप्रिलच्या रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं.

डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Palghar Mob Lynching Case

संबंधित बातम्या :

पालघरमध्ये चोर-दरोडेखोर असल्याच्या अफवेतून तिघांची हत्या, 101 आरोपींना पोलीस कोठडी

Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.