Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा

त्यादिवशी तिथे नेमकं काय घडलं?, याची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज थेट पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गाठलं.

Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा

पालघर : पालघर जिल्ह्यातील मॉब लिचिंग (Palghar Mob Lynching) प्रकरणात (Anil Deshmukh At Gadchinchale) दोन साधूंसह त्यांच्या वाहनचालकाला प्राण गमवावे लागले होते. त्यादिवशी तिथे नेमकं काय घडलं?, याची माहिती घेण्यासाठी राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज थेट पालघर जिल्ह्यातील गडचिंचले (Anil Deshmukh At Gadchinchale) गाठलं.

सुरुवातीला ते कासा पोलीस स्टेशन मध्ये गेले. तिथे त्यांनी गडचिंचले प्रकरणाची सखोल माहिती जाणून घेतली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासदार राजेंद्र गावित आमदार सुनील भुसारा, आमदार श्रीनिवास वनगा प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर त्यांनी थेट गडचिंचले गाठले. घटनास्थळाचे प्रत्यक्ष साक्षीदार गावातील सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबत चर्चा करुन नेमकी घटना कशी घडली हे जाणून घेतले. यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे सुद्धा उपस्थित होते.

यानंतर घटनास्थळाची पाहणी करुन नेमके त्या दिवशी काय घडले? ते सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाणून घेतलं. त्या दिवसाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती सखोलपणे अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी आणि घटनास्थळावर उपस्थित असलेल्या लोकांकडून जाणून घेतली (Anil Deshmukh At Gadchinchale). यावेळी सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण साळुंखे हे सुद्धा उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. शिवाय यापूर्वी, पालघर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 101 आरोपींच्या नांवाची यादी गृहमंत्र्यांनी जाहीर केली होती.

नेमकं प्रकरण काय?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत (Anil Deshmukh At Gadchinchale) आहेत.

संबंधित बातम्या :

पालघरमधील साधूंच्या हत्येचं राजकारण, आता बुलंदशहरबाबत अमित शाह गप्प का? : खासदार हुसेन दलवाई

पालघर हत्याप्रकरणात अटकेतील एकही मुस्लिम नाही, गृहमंत्र्यांकडून 101 आरोपींची नावं जाहीर

पालघर मॉब लिचिंग प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला कोरोना, संपर्कातील 43 जण क्वारंटाईन

Published On - 11:10 pm, Thu, 7 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI