…तर मुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून करावी लागेल : पंकजा मुंडे

बीड : वडिलांची हत्या झाल्याचे कळल्यावर पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाला लाथ मारुन बाहेर पडायला हवे होते, या राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “मुंडे साहेबांची हत्या झाली की नाही झाली, हा विषय तुमचा नाहीय महोदय. आणि तुम्ही राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे बोलत आहात, तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून […]

...तर मुंडे साहेबांच्या मृत्यूची चौकशी राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून करावी लागेल : पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

बीड : वडिलांची हत्या झाल्याचे कळल्यावर पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाला लाथ मारुन बाहेर पडायला हवे होते, या राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “मुंडे साहेबांची हत्या झाली की नाही झाली, हा विषय तुमचा नाहीय महोदय. आणि तुम्ही राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे बोलत आहात, तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे.”. बीडमधील जाहीर सभेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची मुलगी (पंकजा मुंडे) मंत्रिमंडळात आहे. वडिलांची हत्या झाल्याचे कळल्यावर पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाला लाथ मारुन बाहेर पडायला हवे होते. मात्र त्यांनी अजून तसे केले नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते.

पंकजा मुंडेंनी जयंत पाटलांना काय उत्तर दिले? जसंच्या तसं –

“या साल्या लुच्चे लबाड लोक आहेत, मुंडे साहेबांचा मृत्यू सुद्धा एक मोठी संधी वाटत आहे. अरे, मी मुंडे साहेबांची लेक आहे. मुंडे साहेबांना काय झालं, हे मला माहित असेल, तर ज्याने केलंय, त्याचा जीव घेण्याची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. मला कुठल्याही एजन्सीची गरज नाही. माझ्या बापाला काही झालं असेल तर त्या माणसाचा जीव घेऊन माझा स्वतःचा जीव जागच्या जागी जाईल.

शोभतं हे जयंत पाटलांना? ते म्हणतात, पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, कारण मुंडे साहेबांची हत्या झाली. मुंडे साहेबांची हत्या झाली की नाही झाली, हा विषय तुमचा नाहीय महोदय. आणि तुम्ही राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे बोलत आहात, तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे. तुम्हाला माहित असली पाहिजे. तुम्हाला चार वर्षानंतर माझ्या बापाच्या मृत्यूमध्ये राजकारण दिसतं? आणि त्या राजकारणात तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे, ते म्हणजे पंकजा मुंडेंचा राजीनामा पाहिजे? एवढी का पंकजा मुंडेंची भीती आहे? मी एक आवाज दिला तर मुंबई-दिल्लीपर्यंत माझे लोक यायला तयार आहेत. पण माझ्या लोकांनी लाठ्या-काठ्या खाव्यात अशी यांची चाल आहे. पण असल्या भूलथापांना बळी पडू नका. मी सीबीआय ऑफिसर नाही की हॅकर नाही. मी मुंडे साहेबांची लेक आहे. खालच्या पातळीवर घाणेरडं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही झालं नाही.” – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

दरम्यान, आता या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील किंवा राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

VIDEO : 

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.