दिवाळीसाठी आलेल्या पाहुण्याची हजार रुपयांसाठी हत्या, चोरट्याला अटक

कर्नाटकवरुन आलेला हा तरुण कळंबोली येथील स्मृतीवन उद्यानात फिरायला गेला होता.

दिवाळीसाठी आलेल्या पाहुण्याची हजार रुपयांसाठी हत्या, चोरट्याला अटक
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 4:08 PM

पनवेल : नातेवाईकाकडे दिवाळीसाठी आलेल्या पाहुण्याची चोरट्याने हत्या केल्याची धक्कादायक (Panvel Murder Case) घटना पनवेल येथे घटली आहे. त्याला कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकवरुन आलेला हा तरुण कळंबोली येथील स्मृतीवन उद्यानात फिरायला गेला होता. यावेळी चोरट्याने त्याचा गळा दाबून खिशातील हजार रुपये घेवून पसार झाला होता (Panvel Murder Case).

नागनाथ कल्लप्पा माले (वय 31) हा तरुण पनवेल येथील रामणा संतोषकर यांच्याकडे दिवाळी सणासाठी आला होता. चार दिवसांपुर्वी नागनाथ कळंबोलीतील स्मृतीवन उद्यानात फिरायला गेला असताना त्याची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणाचा कळंबोली पोलिसांनी छडा लावला असून पनवेल येथील साईबाबा मंदिरासमोरील झोपडपट्टीतून मारेकऱ्यांपैकी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मृत तरुणाच्या खिशातील एक हजार रुपये चोरी करण्यासाठी त्याचा खून करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत सोमवारी परिमंडळ-2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

गुरुवारी कळंबोली सेक्टर 2 ई. सिडकोच्या स्मृतीवन गार्डन येथे अनोळखी मृत इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड, अंमलदार आणि गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित अनोळखी मृतदेहाची पाहणी केली. त्या ठिकाणी ओळखपत्र आणि पॉकेटमध्ये डायरी आढळून आली. त्यावरुन मृताच्या नातेवाईकांचा शोध देण्यात आला. त्यांना त्वरित या ठिकाणी बोलून घेण्यात आले. संबंधितांना मृतदेहाची ओळख पटली.

त्यानुसार, मृताचे नाव नागनाथ कल्लप्पा माले असल्याचं समोर आलं. या प्रकरणात कळंबोली पोलीस ठाण्यात कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपीबाबत काहीही माहीती नव्हते. तसेच, गुन्ह्याच्या ठिकाणी आरोपींनी काहीही सुगावा मागे ठेवला नसल्याने गुन्ह्यांची उकल करणे मोठे आव्हानात्मक होते. गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने कोणतेही धागेदोरे नसताना विशेष पथक चार पथक तयार करण्यात आले.

गोपनिय बातमीदारांकडुन माहिती घेण्यात आली. रात्रंदिवस मेहनत घेवून कळंबोली पोलीस पनवेल शहरातील झोपडपट्टीमधून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने इतर तीन साथीदारांसह हजार रुपये लुटण्याच्या उद्देशाने खून केला असल्याची कबुली दिली. संबंधित आरोपी हा काम धंदा नसलेला फिरस्ता असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड हे करीत आहेत. इतर आरोपींचा शोध घेणे कामी विशेष पथक रवाना करण्यात आले, असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.

Panvel Murder Case

संबंधित बातम्या :

वसई-विरार-नालासोपारा, ठाणे, मुंबईतील वाहन चोरणारी टोळी गजाआड, 13 लाखांच्या गाड्या जप्त

आकर्षक व्याज आणि बोनसचं आमिष, गुंतवणूकदारांचे 35 कोटी घेऊन संचालक फरार; नागपूर पोलिसांकडून शोध सुरु

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.