लोकलमध्ये प्रवाशांच्या डुलक्यांचा गैरफायदा, लॅपटॉप चोराला अटक

| Updated on: Mar 05, 2020 | 7:31 AM

हार्बर मार्गावर प्रवासात लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक (Laptop Theft in local train) केली.

लोकलमध्ये प्रवाशांच्या डुलक्यांचा गैरफायदा, लॅपटॉप चोराला अटक
Follow us on

मुंबई : हार्बर मार्गावर प्रवासात लॅपटॉप चोरी करणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक (Laptop Theft in local train) केली. त्याच्याकडून 6 लॅपटॉप आणि एक आयपॅड हस्तगत करण्यात आला. याची एकूण किंमत 3 लाख रुपये आहे. अजय चव्हाण (35) असे या आरोपीचे नाव आहे.

अजय चव्हाण हा मूळ उत्तर प्रदेशातील रहिवाशी (Laptop Theft in local train) असून तो शिवडीमध्ये राहतो. गेल्या अनेक महिन्यांपासून तो हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिन्स ते वडाळा रोड या स्थानकादरम्यान गर्दीच्या वेळी प्रवास करायचा.

अनेक प्रवाशी कामावरुन लॅपटॉप घेऊन जाताना लोकल ट्रेनमधील वरच्या रॅकवर लॅपटॉपची बॅग ठेवतात. अनेक प्रवासी मोबाईल किंवा झोपेत असताना आरोपी नकळत ती बॅग चोरत आणि ते लॅपटॉप दुसऱ्याला विकत.

याबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करुन आरोपीवर पाळत ठेवली. त्यावेळी संशयित आरोपी अजय चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने 6 लॅपटॉप आणि एक आयपॅड काढून पोलिसांना दिले. तसेच हे आयपॅड किंवा लॅपटॉप विकत घेणाऱ्या आरोपी एकनाथ वलेकर याला सुद्धा पोलिसांनी अटक केली.

तसेच ज्यांचे लॅपटॉप हरवले असतील आणि तक्रार केली नसेल अशा व्यक्तींनी वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनशी संपर्क साध्यण्याचं आवाहन रेल्वेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी केले (Laptop Theft in local train) आहे