हार्दिक पटेल ‘आम आदमी पक्षा’च्या वाटेवर?

पाटिदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसची साथ सोडून 'आम आदमी पक्षा'त प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे

हार्दिक पटेल 'आम आदमी पक्षा'च्या वाटेवर?
Follow us
| Updated on: Mar 03, 2020 | 12:47 PM

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर ‘आम आदमी पक्ष’ इतर राज्यातही संघटनेला बळ देण्याच्या तयारीत आहे. गुजरातमधील पाटिदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसची साथ सोडून ‘आप’च्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. (Hardik Patel may join AAP)

दिल्ली निवडणुकांनंतर हार्दिक पटेल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत फोटो शेअर करुन त्यांचं अभिनंदन केलं होतं. तेव्हापासून हार्दिक पटेल यांच्या ‘आप’प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं. परंतु हार्दिक पटेल काँग्रेससोबतच राहणार असल्याचं पाटिदार नेत्यांनी सांगितलं.

आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते मार्चअखेरीस गुजरात दौरा करणार आहेत. त्यावेळी हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

दरम्यान, राज्यसभेच्या चार जागांसाठी नजीकच्या काळात निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर दबावतंत्र निर्माण करण्यासाठी हार्दिक पटेल यांच्या वतीने ‘आप’प्रवेशाची अफवा पसरवली जात आहे, असा आरोप टीकाकारांनी केला आहे.

हार्दिक पटेल बेपत्ता असल्याचा दावा त्यांची पत्नी किंजल यांनी ट्विटरवरुन केला होता. हार्दिक पटेल यांना 18 जानेवारीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं होतं, तेव्हापासून ते घरी परतलेले नाहीत, असं किंजल यांनी लिहिलं होतं.

हार्दिक पटेलांविरोधात 20 हून अधिक खटले सुरु आहेत. यापैकी दोन देशद्रोहाशी निगडीत आहेत. 2015 मध्ये त्यांनी पाटीदार आरक्षण आंदोलनाचं नेतृत्त्व केल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Hardik Patel may join AAP

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.