Payal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे, पायल घोष दिल्लीला रवाना!

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणारी अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) आता राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे ठोठावणार आहे.

Payal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे, पायल घोष दिल्लीला रवाना!

मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणारी अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) आता राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे ठोठावणार आहे. अनुराग कश्यप विरोधात ती राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार आहे. आज (5 ऑक्टोबर) ती मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाली. मुंबई पोलिसकडून न्याय मिळण्याची आशा नसल्याचे म्हणत, तिने थेट दिल्लीला धाव घेतली आहे (Payal Ghosh meet National Commission for women to take action on Anurag kashyap).

पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) विरोधात लैंगिक शोषण आणि बलात्काराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात अनुराग कश्यपची तब्बल 8 तास चौकशीदेखील झाली होती. तरीही मुंबई पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचे म्हणत तिने राष्ट्रीय महिला आयोगकडे या प्रकरणी तक्रार दाखल करायचे ठरवले आहे. पायल घोषची (Payal Ghosh) राष्ट्रीय महिला आयोगासोबत बैठक पार पडली असल्याचे, तिचे वकील नितीन सातपुते यांनी जाहीर केले आहे.

पायल घोषकडून अनुरागवर आरोप

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायल घोषने (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. याशिवाय तिने पोलिस स्थानकात अनुराग विरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. (Payal Ghosh meet National Commission for women to take action on Anurag kashyap)

रामदास आठवलेंसह पायलने घेतली राज्यपालांची भेट

अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (Anurag Kashyap) अत्याचार केल्याचे आरोप केले होते. यासंदर्भात पायल घोषने मुंबई पोलिसात तक्रार देखील दाखल केली. मात्र, अनुरागवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने, रामदास आठवले-पायल घोष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर तिने रामदास आठवलेंसह राज्यपाल कोश्यारींची भेट घेतली होती.

अनुराग कश्यपची तब्बल 8 तास चौकशी

याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर अनुराग कश्यपची वर्सोवा पोलिस स्थानकात तब्बल आठ तास चौकशी झाली. चौकशीदरम्यान त्याने त्याच्यावर लावण्यात आलेल्या बलात्कार आणि इतर सर्व आरोपांचे खंडन केले. पायल घोषला (Payal Ghosh) मी फक्त प्रोफेशनली ओळखतो. त्याशिवाय, गेल्या अनेक काळापासून माझे पायलशी बोलणेही झाले नसल्याचे, अनुरागने पोलिसांना सांगितले.

(Payal Ghosh meet National Commission for women to take action on Anurag kashyap)

संबंधित बातम्या : 

Anurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी

Anurag Kashyap | अनुराग कश्यपची चौकशी संपली, 8 तासानंतर पोलिस स्थानकातून बाहेर

 दिग्दर्शक अनुराग कश्यपची चौकशी होणार, पायल घोष प्रकरणी मुंबई पोलिसांचे समन्स

तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल, राज्यपालांचे पायल घोषला आश्वासन

Published On - 5:07 pm, Mon, 5 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI