पुण्यात करणी काढण्याच्या बहाण्याने दोन उच्चशिक्षित बहिणींचं लैंगिक शोषण

करणी काढण्याच्या आणि आजार बरे करण्याच्या बहाण्यानं पुण्यातील उच्चशिक्षित महिलांचा  विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे (Physical abuse of sisters in Pune).

पुण्यात करणी काढण्याच्या बहाण्याने दोन उच्चशिक्षित बहिणींचं लैंगिक शोषण
Karani Black Magic

पुणे : करणी काढण्याच्या आणि आजार बरे करण्याच्या बहाण्यानं पुण्यातील उच्चशिक्षित महिलांचा  विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे (Physical abuse of sisters in Pune). पीडितांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या (अंनिस) मदतीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी भोंदू बाबाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. भरत केमदाणे (वय 72, रा. लोणी शेंदरे ता. कुर्डूवाडी जि. सोलापूर) असं या भोंदूबाबाचं नाव आहे.

पुण्यातील उच्चशिक्षित दोघी बहिणींना घरात अनेक अडचणी येत होत्या. घरात मुलीच्या आजारपणामुळेही सतत वादविवाद होत होते. तेव्हा त्यांच्या जवळच्या एका महिलेने बाहेरचं काही आहे का? ते पाहण्यास सांगितलं. तसेच संबंधित बाबाचा मोबाईल नंबर दिला. यावर पीडित महिलांनी आरोपी भोंदू बाबा भरत केमदानेला फोन करून याबाबत विचारणा केली. घरातील अडचणी, आजार, आर्थिक प्रश्न याविषयी सांगितल्यावर आरोपीने यासाठी पुजा करावी लागेल असं सांगितलं. त्यासाठी 7000 रूपये खर्च येणार असल्याचं सांगितलं. ती पुजा लवकरच करावी लागेल असंही सांगितलं.

यानंतर आरोपीने 11 फेब्रुवारी 2020 रोजी पीडित महिलांच्या घरी जाऊन त्यांना करणी झाल्याचं सांगितलं. यासाठी पुजा करायचंही ठरलें. आरोपी भरत केमदाणे याने घरी आल्यानंतर पीडित महिलांना तुमच्यावर करणी झाल्याचं सांगितलं. तुमच्याच घरातील लोकांनी करणी केली आहे. त्यामुळे सर्व समस्या येत आहेत. असाही दावा केला. ही करणी करणी काढावी लागेल असंही सांगितलं.

आरोपी बाबाने पुजेऐवजी उतारा काढावा लागेल असं सांगितलं. तसेच तो उतारा पाण्यात टाकावा लागेल असंही म्हटलं. दोघी बहिणींना एक एक करुन लिंबाचा उतारा टाकायचा आहे असं सांगून त्यांना एक एक करुन बाथरुममध्ये नेलं. सुरुवातीला आरोपीने एका महिलेला आत बोलावलं. तिला सलवार काढण्यास सांगितले. पीडितेने सलवार काढण्यास नकार दिला असता, बाबाने करणी उतरायची असेल तर कपड्यांचा स्पर्श चालत नाही, असं सांगितलं.  तसंच बरं व्हायचं असेल तर हे करावंच लागेल, लाजायचे नाही, असं म्हटलं.

“माझं काम डॉक्टरसारखं म्हणत महिलांचं लैंगिक शोषण”

माझं काम डॉक्टरसारखं तपासण्याचं आहे. असं करुन त्याने पोटाला हळदी कुंकु लावले आणि छातीला-गुप्तांगाला लिंबु लावलं. याबाबत महिलेनं विचारलं असता करणी कवटाळा किंवा अवघड जागीच धरतात असं सांगितलं. हाच प्रकार दुसऱ्या बहिणीच्या बाबतीतही केला. लिंबु हातात धरून करणी उतरली नसल्याचा कौल आल्याची बातवणी केली. त्यानंतर रात्री 12 नंतर परत आरोपीने उतारा काढावा लागेल असं सांगितलं.

रात्री बारा वाजता पुन्हा आरोपीने उतारा करताना पीडित महिलेला गादीवर झोपाण्यास सांगून सलवारची नाडी सोडावयास सांगितली. उतार्‍याच्या बहाण्याने त्यान लिंबू पीडितेच्या छातीला आणि गुप्तांगला लावलं. तसाच प्रकार पुन्हा पीडित महिलेच्या बहिणीसोबतही घडला. त्याने पीडितेच्या बहिणेलाही पुन्हा बाथरूममध्ये नेऊन लिंबू टॉपमध्ये आणि सलवारमध्ये टाकले. नंतर ते लिंबू शरीरावरून फिरवून पाण्यात टाकलं.

या प्रकारानंतर पीडित महिलांनी काही दिवस या करणीच्या प्रकाराविषयी विचार केला. मात्र, असं काहीही नसून हे केवळ शारीरिक शोषणाचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर त्या दोघी बहिणींनी करणीच्या नावाने झालेल्या फसवणुकीची माहिती हमीद दाभोलकरांना दिली. त्यांनी पीडितांना पुण्यातील अंनिसच्या कार्यकर्त्याना भेटण्यास सांगितलं.

पीडितांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी सर्व प्रकार समजून घेतला. पीडितांचे पुजा आणि करणीच्या नावानं शारीरिक शोषण झाल्याचं समजताच त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. तसेच बार्शी येथील अंनिसचे कार्यकर्ते विनायक माळी यांच्या मार्फत आरोपी भोंदूबाबाची माहिती घेतली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांकडे या भोंदूबाबाच्या सर्व गैरप्रकारांची यादीच दिली.

आरोपी भोंदूबाबा मुल होत नसेल तर मुलगाच होण्याचं आमिष दाखवायचा. करणी काढण्याच्या नावाने बर्‍याच महिलांची फसवणूक आणि शोषण केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. यानंतर कोथरूड पोलिस ठाण्याचे ए. सी. पी. मच्छिंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रतिभा जोशी यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं. आरोपी विरोधात “जादुटोणा कायदा अंतर्गत”गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच आरोपीला अटक करण्यात आली. यात पोलिस निरिक्षक वृषाली पाटील यांचंही विशेष सहकार्य मिळालं.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, माधव गांधी, मिलिंद सोनटक्के, राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख या सर्वांनी पुढाकार घेत या प्रकरणी पीडितांची बाजू घेतली. संबंधित प्रकरणात आणखी कोणासही फसवसे असेल, तर त्यांनी निर्भयपणे पोलिसांना अथवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले.

Physical abuse of sisters in Pune

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI