पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडणुकीची लगबग सुरु ; नगरसेवकांची संख्या वाढली

पिंपरी - चिंचवड महापालिका आयुक्तांनी 30नोव्हेंबर 21 पर्यंत प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल आहेत. आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल. या निवडणुकीत तीन नगरसेवकांचा एक प्रभाग असेल. यामुळं पिंपरी महापालिकेच्या नगरसेवक संख्येत 11 नं वाढ झाल्यानं ती 128 वरुन 139 वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडणुकीची लगबग सुरु ; नगरसेवकांची संख्या वाढली
पिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी – कोरोना महामारीचा धोका लक्षात घेत आगामी वर्षात होणाऱ्या महानगरापालिकेच्या निवडणुका लांबण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राज्य निवडणूक आयोगानं प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत निश्चित केली आहे. त्यामुळं महापालिकेतील निवडणुकीच्या लगबगीला अखेर वेग आला आहे. महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 128 वरुन139 झाली आहे. नव्यानं निर्माण होणाऱ्या प्रभागांमुळं मतदारांची लोकसंख्या घटणार आहे.

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताच राज्य शासनाने तीन सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2021  मध्ये जनगणना झाली नसल्यामुळं 2011 च्या जणगणनेनुसार ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ होणार नसल्याची चर्चा सुरू होती. तथापि, राज्य शासनाने नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. पिंपरी – चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्तांनी 30नोव्हेंबर 21 पर्यंत प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल आहेत. आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने होईल. या निवडणुकीत तीन नगरसेवकांचा एक प्रभाग असेल. यामुळं पिंपरी महापालिकेच्या नगरसेवक संख्येत11  नं वाढ झाल्यानं ती 128 वरुन 139 वर पोहोचली आहे. महापालिकेची2017 ची निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने झाली होती. नगरसेवकांच्या संख्येत वाढ केल्यानं अनुसूचित जातींच्या (एससी) राखीव जागेत दोननं वाढ होऊन ती 22 झाली आहे. तर, अनुसूचित जमाती (एसटी) साठी 3जागा राखीव राहणार आहेत.38 जागा ओबीसींसाठी तर 76  जागा खुल्या गटासाठी असणार आहे.

महानगरपालिका निवडणूक -2017

  • निवडणूक चार सदस्यीय पद्धती
  • शहराची लोकसंख्या – 17 लाख 27हजार 692
  • एकूण मतदार – 13 लाख 50हजार मतदार
  • सद्यस्थितीला महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या- 128
  • एका प्रभागाची लोकसंख्या 36 हजार ते 44 हजार
  • एकूण प्रभाग – 32

महापालिका सार्वत्रिक निवडणूक : 2022

  •  तीन सदस्यीय 45  प्रभाग
  •  सरासरी लोकसंख्या : 37 हजार 288
  •  10 टक्के कमाल लोकसंख्या : 41हजार 17
  • 10टक्के किमान लोकसंख्या : 33 हजार 559

संबंधित बातम्या : 

एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच ; मागण्यांसाठी कर्मचाऱ्याचं अर्धनग्न आंदोलन

चिमुकल्याचा मृतदेह आढळला गोबर गॅसमध्ये; सोमवारपासून होता बेपत्ता

आयटी पार्कमध्ये गाडी भाड्याने लावा, 25 हजार कमवा, पुण्यातील 300 कारमालकांची कशी झाली फसवणूक?

Published On - 12:56 pm, Tue, 9 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI