चिमुकल्याचा मृतदेह आढळला गोबर गॅसमध्ये; सोमवारपासून होता बेपत्ता

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथून बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह गोबर गॅसमध्ये आढळून आला आहे. शिंगवेमधून सोमवारी 2 वर्षांचा चिमुकला कृष्णा विलास गाढवे हा बेपत्ता झाला होता.

चिमुकल्याचा मृतदेह आढळला गोबर गॅसमध्ये; सोमवारपासून होता बेपत्ता
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 11:31 AM

पुणे – जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथून बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह गोबर गॅसमध्ये आढळून आला आहे. शिंगवेमधून सोमवारी 2 वर्षांचा चिमुकला कृष्णा विलास गाढवे हा बेपत्ता झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह घराशेजारी असलेल्या गोबर गॅसमध्ये आढळून आला आहे. कृष्णाच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, त्याचा मृतदेह पाहाताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा हा सोमवारी आपल्या घराशेजारी खेळत होता. तो तेथून अचानक बेपत्ता झाला. कृष्णा कुठेच दिसत नसल्याने त्याच्या घरच्यांनी परिसरात त्याचा शोध घेतला. सोमवारी दिवसभर शोध घेऊन देखील तो सापडला नव्हता. अखेर आज संशय आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी गोबर गॅसमध्ये पाहिले असता, त्यांना कृष्णा मृतावस्थेमध्ये आढळून आला.

बिबट्याने ओढून नेल्याची चर्चा 

दरम्यान कृष्णा बेपत्ता झाल्यानंतर त्याला बिबट्याने ओढून नेल्याची चर्चा देखील गावात सुरू होती. ग्रामस्थांच्या वतीने याची माहिती वनविभागाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात असलेल्या उसाच्या शेतांमध्ये कृष्णाचा शोध घेतला. मात्र त्यांना कुठेही कृष्णा आढळून आला नाही. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी घराशेजारी असलेल्या गोबर गॅसमध्ये डोकाऊन पाहिले असता त्यांना त्या ठीकाणी कृष्णाचा मृतदेह आढळून आला. कृष्णाच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

अरेरे, गडबडच झाली हो… चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला, औरंगाबाद पोलिसांकडून संशयित ताब्यात

मुंबई-नाशिक महामार्ग बनला मृत्यूचा सापळा; 24 तासांत 5 ठार, दोन दुचाकीच्या टक्करमध्ये आज एक जण गतप्राण

चुलत जावांची एकमेकींच्या पतीविरोधात बलात्काराची फिर्याद, एकीवर गोठ्यात, दुसरीवर लॉजमध्ये अत्याचार

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....