चुलत जावांची एकमेकींच्या पतीविरोधात बलात्काराची फिर्याद, एकीवर गोठ्यात, दुसरीवर लॉजमध्ये अत्याचार

एका पीडित महिलेने तिघा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 दरम्यान भोर तालुक्यातील संबंधित पीडित महिलेच्या शेतामध्ये घडल्याचा दावा केला जात आहे.

चुलत जावांची एकमेकींच्या पतीविरोधात बलात्काराची फिर्याद, एकीवर गोठ्यात, दुसरीवर लॉजमध्ये अत्याचार
पुणे- खेड शिवापूर पोलीस स्टेशन

पुणे : नात्यातील दोन महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दिली आहे. पुणे जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजगड पोलीस ठाण्यात दोन गटातील चार जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चारही जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बलात्काराचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या विचित्र घटनेमध्ये राजगड पोलिसांनी दोन गटातील चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नात्याने एकमेकींच्या चुलत जावा असलेल्या दोन पीडित महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.

भोरमधील महिलेची पहिल्यांदा तक्रार

यामध्ये एका पीडित महिलेने तिघा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 दरम्यान भोर तालुक्यातील संबंधित पीडित महिलेच्या शेतामध्ये घडल्याचा दावा केला जात आहे.

गोठ्यात चुलत दिरासह तिघांकडून अत्याचार

शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यास गेलेल्या या महिलेचा तिच्या चुलत दिराने विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोन सहकाऱ्यांसोबत संगनमत करून गोठ्यामध्ये प्रवेश केला आणि गोठ्याच्या दरवाजाला आतून कडी लावत आळीपाळीने बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित महिलेने राजगड पोलिसांकडे दिली.

मुख्य आरोपीच्या पत्नीकडूनही फिर्याद

यावरून राजगड पोलिसांनी संबंधित तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे संबंधित आरोपीच्या पत्नीनेही बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा फिर्यादी महिलेच्या पतीविरोधात दाखल केला आहे.

लॉजवर बलात्कार केल्याचा आरोप 

यामध्ये 31 वर्षीय मजुरी करणाऱ्या संबंधित पीडितेने कापूरहोळ येथील एका लॉजवर आणि पीडितेच्या राहत्या घरी ऑक्टोबर 2020 पासून 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास राजगड पोलिस करत असून वरील चारही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकायांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, गोठ्यात डांबून दोघांकडून अत्याचार

कुटुंब आनंदात निघालेलं, हायवेवर अचानक कारमध्ये गोळी घुसली, दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

Published On - 9:32 am, Tue, 9 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI