एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच ; मागण्यांसाठी कर्मचाऱ्याचं अर्धनग्न आंदोलन

पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज अर्धनग्न होत आंदोलन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. आता ३० महामंडळांचे राज्य सरकारमध्ये विलीकीकरण करण्यात आले. मग एसटीचे का नाही? जोंपर्यंत आमची मागणी मान्य होत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याची माहिती आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच ; मागण्यांसाठी कर्मचाऱ्याचं अर्धनग्न आंदोलन
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 11:55 AM

पुणे – महाराष्ट्रातील  एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अद्याप संपलेला नाही. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही एसटी कामगार कामावर न परतल्यानं प्रवाश्यांची मोठी गैरसोय निर्माण झाल्याचं दिसून आले आहे. शहरातील स्वारगेटबस आगारात आजही एकही बस आलेली नाही. या डेपोतून लांबपल्ल्याच्या कोणत्याही गाड्या आलेलया नाहीत. तसेच यामुळे प्रवाश्यांची तारंबळ उडाली आहे. दूरच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवासी अद्यापही स्थानकातच अडकून पडले आहेत. तर जिल्हातंर्गत प्रवासाच्या बसेसही आगारातून बाहेर पडलेल्या नाहीत. स्वारगेट शिवाजीनगरसह शहरातील 13बस डेपोतील एसटीची वाहतूक पूर्ण बंद आहे.

महामंडळ कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन राज्यात बेमुदत संपावर असलेले एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. संपाच्या दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज अर्धनग्न होत आंदोलन केलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. आता 30 महामंडळांचे राज्य सरकारमध्ये विलीकीकरण करण्यात आले. मग एसटीचे का नाही? जोंपर्यंत आमची मागणी मान्य होत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याची माहिती आंदोलनात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

उच्च न्यायालयाचा आम्ही कोणत्याही प्रकाराचा अवमान करत नसून, आमचं आंदोलन हे जीआरमधील तरतुदी बाबत आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आमचा समावेश करावा, त्या कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच आम्हालाही वेतन द्यावे एवढीच आमची मागणी आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असून आमच्या कुटुंबियांना घेऊन रस्त्यावर उतरू अशी भूमिका आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाश्यांची लूट

एसटीचा संप सुरू असल्यानं अनेक प्रवाशी खासगी वाहनांचा पर्याय अवलंबत आहेत. मात्र हे खासगी वाहतूकदार प्रवाश्यांकडून अव्वाच्या- सव्वा भाडे आकारात प्रवाश्यांची लूट करताना दिसून आपले आहे. मनमानी कारभार करता प्रवासासाठी मनाला वाटेल तितकी रक्कम प्रवाश्यांकडे मागितली जात आहे.

संबंधित बातम्या :

चुलत जावांची एकमेकींच्या पतीविरोधात बलात्काराची फिर्याद, एकीवर गोठ्यात, दुसरीवर लॉजमध्ये अत्याचार

सायन हॉस्पिटलच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग, 24 वर्षीय तरुणावर गुन्हा

अरेरे, गडबडच झाली हो… चोरी केलेल्या घरात चोर स्वतःचा मोबाइलच विसरला, औरंगाबाद पोलिसांकडून संशयित ताब्यात

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.