AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे दुर्घटनेत दोन्ही पाय गमावले, रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह, पिंपरीतील तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या नागेशचे काही वर्षापूर्वी रेल्वे अपघातात दोन्ही पाय निकामी (Pimpri Chinchwad Nagesh Kale Drive Rickshaw) झाले.

रेल्वे दुर्घटनेत दोन्ही पाय गमावले, रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह, पिंपरीतील तरुणाचा प्रेरणादायी प्रवास
| Updated on: Jun 26, 2020 | 10:07 PM
Share

पिंपरी चिंचवड : मुंबईतून मित्राला भेटून नागेश काळे हा तरुण रेल्वेने परत पिंपरी चिंचवडला निघाला. तो पिंपरीमध्ये पोहोचला खरा, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. पिंपरी चिंचवडच्या कासारवाडीत तो रेल्वेतून खाली पडला. या दुर्घटनेत त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. पण तो खचला नाही. पुन्हा जिद्दीने उभा राहिला. अनेकांना प्रेरणा देणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील नागेश काळेची प्रेरणादायी कहाणी.. (Pimpri Chinchwad Nagesh Kale Drive Rickshaw after lost two legs in railway accident)

नागेश  हा रिक्षा चालवून तो स्वतः चं घर चालवतो. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या नागेशचे काही वर्षापूर्वी रेल्वे अपघातात दोन्ही पाय निकामी झाले. ऐन तरुण वयातच पाय गेल्याने जगायचं की आत्महत्या करायची असा प्रश्न त्याला पडला  असेलच पण तो हरला नाही. वडील नसल्यानं आईला सांभाळायचं हा विचार त्याने केला. त्यामुळे खचून न जाता उभारी घ्यायचं ठरवलं.

अवघ्या शंभर दिवसात पुन्हा एकदा रिक्षाचं स्टेरिंग आपल्या हाती घेतलं. आज तो पाय नसताना तो कुटुंबाचं पालन पोषण करतो. त्यामुळे तो खऱ्या अर्थानं स्वत: च्या पायावर उभा आहे. जगताना कोणताही प्रश्न आला तरी त्याला उत्तर असतंच असंही तो सांगतो.

“नागेशचा अपघात झाल्याचं आठवलं तरी त्याच्या आईला अश्रू अनावर होतात. पण तो कष्ट करतो याच ही त्यांना कौतुक आहे. अनेकांनी त्यावेळी मदत केली. पण ती मदत आयुष्यभर टिकणारी नव्हती. म्हणूनच त्याने ऑटो रिक्षा घेतली आणि आपल्या हिंमतीवर उभा राहिला,” असे त्याच्या आईने सांगितले.

विशेष म्हणजे नागेश काळे कुटुंबियांच्या संसाराला लॉकडाऊनची ही नजर लागू शकली नाही. शुल्लक कारणाने जीवन संपवणारे अनेक तरुण आपण पाहतो. पण जीवघेणा अपघात झाला असताना त्याचं भांडवल करुन आयुष्य जगण्यापेक्षा संघर्ष करणारा नागेश अनेकांना प्रेरणा देत आहे.  (Pimpri Chinchwad Nagesh Kale Drive Rickshaw after lost two legs in railway accident)

संबंधित बातम्या : 

वय अवघं 24 वर्ष, लॉकडाऊनमध्ये कमावले लाख रुपये, नोकरी सोडलेल्या MBA तरुणीची यशोगाथा

Konkan Beach Shacks | आदित्य ठाकरेंचा पुढाकार, गोव्याची मजा कोकणात, बीच शॅक्सने स्थानिकांना 80 टक्के रोजगार

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.