Corona Vaccine | नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्यासाठी व्यवस्था करा : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींनी आरोग्य यंत्रणेला नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्याची व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Corona Vaccine | नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्यासाठी व्यवस्था करा : पंतप्रधान मोदी
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 12:32 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना साथीरोगाची स्थिती आणि कोरोना लस व्यवस्थापन याबाबत विशेष बैठक घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेला नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्याची व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा उपयोग देखील केला जाऊ शकतो. या बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, निती आयोगाचे सदस्य (आरोग्य), प्रमुख वैज्ञानिक सल्लागार इत्यादी उपस्थित होते (PM Modi direct to make arrangements for fast delivery of corona vaccines).

पंतप्रधानांनी या बैठकीत देशात सातत्याने कमी होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर समाधान व्यक्त केलं. या बैठकीत भारतात तीन कोरोना लस तयार होत असल्याची माहितीही देण्यात आली. यातील दोन लस वैद्यकीय चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात, तर एक लस तिसऱ्या टप्प्यात आहे. भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन पथकं शेजारी राष्ट्र असलेल्या अफगानिस्तान, भुतान, बांग्लादेश, मालदीव, मॉरीशस, नेपाल आणि श्रीलंका या देशांमध्ये देखील संशोधनाला मदत करत आहेत. बांग्लादेश, म्यानमार, कतर आणि भुतानने तर आपल्या देशात कोरोना लसीचं परिक्षण करावं यासाठी विनंती केली आहे.

IANS ने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपले प्रयत्न केवळ शेजारी राष्ट्रांपर्यंत मर्यादित नको राहायला, तर कोरोना लस आणि औषधं संपूर्ण जगात पोहचवण्यासाठी आपण मंच तयार करायला हवा.”

लस साठवण आणि वितरणाचा आराखडा तयार

कोरोना लस वितरणासाठी राज्य सरकारच्या शिफारशींनुसार नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन आणि इतर सर्व संबंधितांनी लस साठवण, वितरण आणि लस टोचणे याबाबत सविस्तर आराखडा तयार केला आहे. राज्य सरकारच्या सुचनांनुसार तज्ज्ञांचं पथक लस देण्याचा प्राधान्यक्रम आणि लस वितरण यावर सक्रियपणे काम करत आहे.

पंतप्रधानांनी देशाचा भौगोलिक विस्तार आणि विविधता लक्षात घेऊन कोरोना लस अधिक वेगाने पोहचवण्यासाठीची व्यवस्था तयार करण्यास सांगितलं आहे. लॉजिस्टिक्स, वितरण आणि व्यवस्थापन अशा प्रत्येक टप्प्यावर कठोर अंमलबजावणी व्हावी, असंही सांगण्यात आलं आहे. यात शीतगृहं, वितरण नेटवर्क, निरिक्षण तंत्र आणि आवश्यक उपकरणं यांची तयारी करण्यावर भर देण्यास सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | “साईड इफेकट्स’चा धोका”, 24 तासात 2 कोरोना लसींच्या चाचण्यांवर बंदी

जगभरातील 10 कोरोना लस वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात, वर्षअखेर लस येण्याचा WHO चा अंदाज

WHO ने दिली आनंदाची बातमी, कोरोनाची लस कधी येणार? यावर मोठं विधान

PM Modi direct to make arrangements for fast delivery of corona vaccines

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.