मुंबई : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर आधारित चिपत्रपट ‘पीएम नरेंद्र मोदी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर आज रिलीज करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे पोस्टर लॉन्च झालं. यात अभिनेता विवेक ऑबेरॉय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटात त्याने बऱ्यापैकी मोदींचा लूक मॅच केला आहे. या पोस्टरवर विवेक ऑबेरॉय जो मोदींच्या भूमिकेत आहे, त्याच्या मागे राष्ट्रध्वज फडकतो आहे. या चित्रपटाला ‘देशभक्ती ही मेरी शक्ती’ ही पंचलाईन देण्यात आली आहे. 2019 लोकसभा निवडणुकांआधी हा चित्रपट मोदींचा मास्टरस्ट्रोक ठरु शकतो.
नरेंद मोदींची बायोपिक असणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर 23 भाषांमध्ये रिलीज करण्यात आले आहे. उमर कपूर हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटातून मोदी यांच्या एक भाऊ, पुत्र, सेवक, नेता, योगी अश्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. ही भूमिका माझ्यासाठी आजवरची सर्वात कठीण भूमिका आहे, असं विवेक ओबेरॉयने सांगितले. तर हा एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे, कारण नरेंद्र मोदी हे केवळ देशाचेच नाही तर जगाचे नेतृत्व करू शकतात असे नेते आहेत, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
This is film is set to create history today with the poster launch of a film based on the life of world leader born in India, a RajYogi in true sense! Congratulations to this team who is going to be a winning team, eventually ! pic.twitter.com/ydgyRAwD96
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 7, 2019
विवेक ऑबेरॉयने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं. यावेळी विवेकने याला- ‘आम्हाला या अद्भुत प्रवासासाठी आपल्या प्रार्थना आणि आशिर्वाद हवा आहे’, असे लिहिले.
जय हिन्द. జై హింద్. ஜெய் ஹிந்த். Jai Hind ??? We humbly ask for your prayers and blessings on this incredible journey. #AkhandBharat #PMNarendraModi pic.twitter.com/t0lQVka7mJ
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) January 7, 2019
मागील दोन वर्षांपासून या चित्रपटाचे काम सुरु आहे. आधी या चित्रपटात अभिनेता परेश रावल मोदींची भूमिका साकारणार होते. मात्र या भूमिकेसाठी विवेक ऑबेरॉयला निश्चित करण्यात आले.
2014 च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने सोशल मीडियाला आपले शस्त्र बनवले होते. सोशल मीडिया कँपेनने मोदी घराघरात पोहोचले. आता 2019 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यातच एकीकडे काँग्रेसचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारीत ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनीस्टर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, तर दुसरीकडे मोंदींचा ‘पी एम नरेंद्र मोदी’ येतो आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी निवडुणांसाठी आता मोठ्या पडद्याची मदत घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि मननोहन सिंह यांच्यानंतर आता ‘पी एम नरेंद्र मोदी’ हा तिसरा असा चित्रपट असणार आहे, जो देशातील बड्या नेत्याच्या जीवनावर आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.