मोदी पुन्हा अ‍ॅक्शनमोडमध्ये, रिपोर्ट कार्ड पाहिलं; मंत्र्यांना काय दिल्या सूचना?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. त्यांनी मंत्र्यांना तथ्यांची माहिती ठेवण्याचे, लोकांशी व माध्यमांशी संवाद साधण्याचे आणि सरकारची बाजू मांडण्याचे निर्देश दिले. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आव्हाने ओळखून उपाययोजना करण्यासोबतच अधिकाऱ्यांशी बोलून लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळवून देण्यावर भर देण्यासही पंतप्रधानांनी सांगितले.

मोदी पुन्हा अ‍ॅक्शनमोडमध्ये, रिपोर्ट कार्ड पाहिलं; मंत्र्यांना काय दिल्या सूचना?
narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 2:44 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड चेक केलं आहे. या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड पाहिल्यानंतर मोदींनी मंत्र्यांना दोन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तथ्यांची माहिती ठेवा आणि योग्य पद्धतीने ते मांडा. तसेच कोणत्याही मुद्द्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. नकारात्मक गोष्टींची उत्तरे द्या. जनते समोर सरकारची बाजू मांडा, अशा सूचनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत. भाजपचं दोन दिवसाचं चिंतन शिबीर पार पडलं. यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. एसआयआर प्रक्रिया आणि आयआयटी मुंबईतील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे.

पंतप्रधानांनी मंत्र्यांना मतदारसंघात जाऊन लोकांशी आणी मीडियाशी संवाद साधायला सांगितलं आहे. जनता आणि मीडियासमोर तुम्ही सरकारची बाजू मांडा, असं त्यांनी म्हटलंय. या चिंतन शिबिरातील उपस्थितांपैकी काहींच्या मते, मंत्र्यांना विषयांची माहिती असावी आणि त्यांनी मीडिया आणि जनतेसमोर विषय व्यवस्थित मांडला पाहिजे. तथ्य व्यवस्थित सांगितले पाहिजे, असं मोदींनी स्पष्ट केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतची बातमी दिली आहे.

आव्हाने पाहा आणि मार्ग काढा

यावेळी मोदींनी मंत्र्यांना इतरही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. तुम्ही आव्हाने पाहा. त्यातील त्रुटी समजून घ्या. त्या दुरुस्त करा. सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाय सूचवा. लाभार्थ्यांना निर्धारित वेळेत लाभ मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने या योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. सर्व स्तरातील अधिकाऱ्यांशी चर्चा करा, असा सल्लाही त्यांनी दिला. एक मंत्री त्याच्या विभागातील सेक्रेटरीच्या खालच्या अधिकाऱ्यांशी चर्चाच करत नसल्याचं लक्षात आल्याचंही मोदींनी सांगितलं.

अधिकाऱ्यांशी बोला

चांगली कामगिरी करायची असेल तर अधिकाऱ्यांशी बोला. त्यांच्याशी संवाद असणं महत्त्वाचं आहे. सुमारे 40-45 प्रमुख कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र व्यक्तीला मिळाला पाहिजे. त्याकडे लक्ष द्या. लाभार्थ्यांना फायदा कसा होईल, याकडे सर्वाधिक लक्ष द्या, असा कानमंत्रही त्यांनी दिला. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मंत्र्यांच्या बैठका घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घेत आहेत. मंत्र्यांना वारंवार सूचनाही करत आहेत. तसेच मंत्र्यांकडून अपेक्षित कामे होत आहेत की नाही याचाही आढावा घेतला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us