PHOTO | 11 लाख दिवे, लेझर शो आणि पंतप्रधान मोदींची उपस्थिती, वाराणसी घाटाचं अविस्मरणीय रुप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौरा आणि देव दीपावलीच्या पार्श्वभूमीवर 80 घाटांवर 11 लाख पणत्या लावल्या जाणार आहेत (PM Narendra Modi visit Varanasi).

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देव दीपावली निमित्ताने वाराणसी दौऱ्यावर आहेत. वाराणसीत मोदींच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाराणसीत त्यांच्या हस्ते 6-लेन हायवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर आज संध्याकाळी वाराणसीत गंगा घाटावर देव दीपावली निमित्ताने मोठा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवातही मोदी सहभागी होणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देव दीपावली निमित्ताने वाराणसी दौऱ्यावर आहेत. वाराणसीत मोदींच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाराणसीत त्यांच्या हस्ते 6-लेन हायवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर आज संध्याकाळी वाराणसीत गंगा घाटावर देव दीपावली निमित्ताने मोठा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवातही मोदी सहभागी होणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौरा आणि देव दीपावलीच्या पार्श्वभूमीवर 80 घाटांवर 11 लाख पणत्या लावल्या जाणार आहेत.
- दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हंडिया ते वाराणसी राजमार्गाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला. जवळपास 73 किमीचा हा रस्ता आहे.
- रस्त्याच्या उद्घाटनानंतर मोदी डोमरी जाणार आहेत. ते भगवान अवधूत रामघाट येथून क्रूजने ललिता घाट येथे जातील. तिथे ते काशी विश्वनाथ मंदिराचं दर्शन घेतील. त्यानंतर ते तेथील विकास कामांचा आढावा घेतील. त्यानंतर ते राजघाटवर दीप प्रज्वलित करुन देव दीपावलीच्या उत्सवास सुरुवात करतील.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रूजने रविदास घाट येथे जातील. त्यानंतर ते चेतसिंह घाट येथील लेजर शो पाहतील. तेथिल दिवे आणि पणत्यांची भव्य रोषणाई पाहिल्यानंतर मोदी लाइट अँड साउंड कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर बाबतपूर विमानतळाहून दिल्लीच्या दिशेला रवाना होतील.
- वाराणसीचे डीए कौशल राज शर्मा यांनी मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही संपूर्ण तयारी केली आहे. पंतप्रधान संध्याकाळी साडे पाच वाजता दीप प्रज्वलन करतील त्यानंतर वाराणसीत 11 लाख दिवे लागतील”, असं कौशल राज शर्मा यांनी सांगितलं.
- पंतप्रधान मोदींच्या वाराणसी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.







