15 दिवसांपूर्वी दुचाकी लंपास, चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर पोस्ट, पोलिसांकडून चोरट्याला अटक

एका चोरट्याने चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर अपलोड केल्यामुळे हा चोरटा पोलिसांच्या हाती लागल्याचा प्रकार समोर आला आहे (Police arrested bike theft Mumbai).

15 दिवसांपूर्वी दुचाकी लंपास, चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर पोस्ट, पोलिसांकडून चोरट्याला अटक

मुंबई : एका चोरट्याने चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर अपलोड केल्यामुळे हा चोरटा पोलिसांच्या हाती लागल्याचा प्रकार समोर आला आहे (Police arrested bike theft Mumbai). ही घटना मुलुंड येथे घडली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून अधिक चौकशी करत आहे (Police arrested bike theft Mumbai).

मुलुंडच्या हरिओम नगर परिसरातून 19 सप्टेंबर रोजी एक दुचाकी चोरी झाल्याची तक्रार नवघर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस तपासात पोलिसांना सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाला. परंतु या सीसीटीव्ही फुटेजमधून या चोराची ओळख पटत नव्हती.

दरम्यानच्या काळामध्ये ज्यांच्यावर संशय आहे त्या व्यक्तींची नावे तक्रारदाराने नवघर पोलिसांकडे सोपविली होती. या संशयितांपैकी राहुल गायकवाड या 27 वर्षीय तरुणाच्या फेसबुक पेजवर त्याने चोरी केलेल्या दुचाकीसह फोटो अपलोड केला होता. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी राहुल गायकवाड याला गजाआड केलं.

पोलिसांनी राहुलला अटक केल्यानंतर चौकशी केली असता त्यानेच ही गाडी चोरली असल्याची कबुली दिली आणि त्याने दिलेल्या जबाबावरून त्याच्या भाऊ समीर गायकवाड याचादेखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलं आहे. या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. तसेच त्यांच्याकडून ही दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

मोबाईल दुकानाचे शटर तोडून चोरी, वसई पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 4 तासात अटक

घरात कुणाला खोकला, ताप? सर्व्हेच्या नावे घरात घुसून चोरीचा प्रयत्न, वृद्धांना लुटणारी टोळी जेरबंद

Published On - 8:57 am, Wed, 7 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI