‘म्हाडा’त स्वस्त घराचे आमिष, पोलीसाकडून 10 लाखाला गंडा

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे एका पोलीस शिपायला अटक करण्यात आली (Police constable fraud) आहे.

'म्हाडा'त स्वस्त घराचे आमिष, पोलीसाकडून 10 लाखाला गंडा

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे एका पोलीस शिपायला अटक करण्यात आली (Police constable fraud) आहे. म्हाडामध्ये स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्यामुळे गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश पाडावे असं अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव (Police constable fraud) आहे.

या प्रकरणी अटक केलेल्या पोलीस शिपायासोबत आणखी दोनजण आहेत. पण यामध्ये एक फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत असून या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

अटक आरोपीने म्हाडाचे घर स्वस्त देण्याचे आमिष दखवून तक्रारदारकडून 10 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला म्हाडाचे आणि उपजिल्हाधिकारी मुलुंड याचे खोटे कागदपत्रे बनवून दिले होते. या संदर्भात 12 फेब्रुवारी 2020 रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

आरोपी पाडावे याला 2 मार्च रोजी नालासोपारावरुन लागोपाठ 2 दिवस पाळत ठेऊन घरातून अटक करण्यात आली. अटकेत असलेल्या पाडावे हा 1996 मध्ये मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाला होता. मात्र नायगांव येथे ड्यूटीवर असताना त्याला अग्निशस्त्र चोरिकरुन विकल्याच्या आरोपात बडतर्फ करण्यात आले होते.

दरम्यान, अटक आरोपी पाडावेच्या विरोधात माटुंगा, पुणे पंतनगर आणि इतर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Published On - 8:20 am, Wed, 4 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI