कोणाला कोंबडा बनवलं, कोणाला उठाबशा, जमावबंदी आदेश मोडणाऱ्या टवाळांना पोलिसांकडून शिक्षा

डोंबिवली पूर्वेतील रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशाची शिक्षा दिली, तर नागपुरात टवाळखोराना कोंबडा बनवण्यात आलं. (Police Punishment Violating Orders)

कोणाला कोंबडा बनवलं, कोणाला उठाबशा, जमावबंदी आदेश मोडणाऱ्या टवाळांना पोलिसांकडून शिक्षा
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 3:59 PM

मुंबई : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनसेवेसाठी रस्त्यावर उतरणं भाग आहे. परंतु काही दीडशहाणे गरज नसताना रस्त्यावर उतरुन प्रशासनावरील ताण वाढवत आहे. सरकारने अशा टवाळखोरांवर कारवाईचा इशारा दिला आहेच. तूर्तास काही जणांना सौम्य शिक्षा देऊन पिटाळून लावण्यात येत आहे. (Police Punishment for Violating Orders in Corona Situation)

नागपुरात कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार लोकांवर पोलिस कारवाई करत आहेत. कोराडी नाका परिसरात पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना चक्क कोंबडा बनवलं आणि उठाबशा काढायला लावल्या. कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन लाऊड स्पीकरच्या माध्यमातून केलं जातं आहे.

डोंबिवली पूर्वेतील रस्त्यावर फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशाची शिक्षा दिली. कारणाविना फिरणाऱ्या तरुणांना तूर्तास सौम्य शिक्षा दिली जात असली, तरी कारवाईचं स्वरुप लवकरच गंभीर केलं जाणार आहे. जनता कर्फ्यूवेळी क्रिकेट खेळणाऱ्या 17 जणांवर कल्याणमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे.

ठाण्यातील ठाणेनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या भाजी मंडईमुळे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कालच्या जनता कर्फ्यूनंतर आज मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले आहेत. त्यामुळे पोलिसांवर कामाचा बोजा वाढलेला दिसत आहे. (Police Punishment for Violating Orders in Corona Situation)

नागरिक खाजगी गाड्या घेऊन बाहेर पडल्याने पोलीस त्यांना जागोजागी अडवून हटकत आहेत. त्यांच्या प्रवासाचे कारण न पटल्यास त्यांना परत पाठवत आहेत. ठाणेनगर पोलीस स्थानकाचे कर्तव्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी हे सकाळपासूनच आपल्या टीम घेऊन गस्त घालत आहेत. जागोजागी बॅरिकेड्स उभारुन वाहनचालकांना हटकले जात आहे.

कोरोनाचा भस्मासूर येणाऱ्या काही दिवसात आपल्या सर्वांना खूपच त्रासदायक ठरणार असून लोकांनी घरातच राहून सरकारने सांगितलेले उपाय करावेत, अशी विनंती पोलीस करत आहेत. अत्यावश्यक असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे, अन्यथा घरीच राहून कोरोनाशी दोन हाथ करण्यासाठी सरकारला हातभार लावावा असे आवाहन केले.

Police Punishment for Violating Orders in Corona Situation

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.