AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, मुस्लीम युवकाचा जेजुरीच्या खंडोबाला नवस

नाशिक :  राजकीय नेत्यांवरील आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी समर्थक काय करतील याचा अंदाज बांधणं तसं कठिण असतं. असाच काहिसा प्रकार नाशिकमध्येही समोर आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींना बराच वेळ शिल्लक आहे. त्याआधी सर्वांचे लक्ष्य लोकसभा निवडणुकीवर आहे. मात्र, निफाड तालुक्यातील चांदोरीच्या मुस्लीम तरुणाने विधानसभेत आपल्या नेत्यांना यश मिळावे यासाठी थेट जेजुरीच्या खंडोबाला नवस केला आहे. […]

अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे, मुस्लीम युवकाचा जेजुरीच्या खंडोबाला नवस
| Updated on: Jul 05, 2019 | 3:36 PM
Share

नाशिक :  राजकीय नेत्यांवरील आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी समर्थक काय करतील याचा अंदाज बांधणं तसं कठिण असतं. असाच काहिसा प्रकार नाशिकमध्येही समोर आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींना बराच वेळ शिल्लक आहे. त्याआधी सर्वांचे लक्ष्य लोकसभा निवडणुकीवर आहे. मात्र, निफाड तालुक्यातील चांदोरीच्या मुस्लीम तरुणाने विधानसभेत आपल्या नेत्यांना यश मिळावे यासाठी थेट जेजुरीच्या खंडोबाला नवस केला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप बनकरांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला होता. ही बाब 5 वर्षांपासून मनात सलत असल्याने मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना चालू असतानाही आपण नवस केल्याचे चांदोरीच्या मुजम्मील शकुर इनामदार या युवकाने सांगितले. त्याने जेजुरीच्या खंडोबाला निफाड विधानसभा मतदारसंघात दिलीप बनकर यांच्या विजयासाठी नवस केला. या नवसात त्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान व्हावे अशीही मनोकामना व्यक्त केली आहे.

लोकसभेच्या निकालानंतर राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या कार्यकर्त्याच्या नवसाला खंडोबा किती पावेल हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या नवसाच्या निमित्ताने मुस्लीम युवकाची धर्मापलिकडे जाऊन केलेली उपासना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.