AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Birthday | पंतप्रधान मोदींचा 70 वा वाढदिवस, भाजपचा जल्लोष, राहुल गांधी ते नेपाळच्या पीएमकडून शुभेच्छा

पंतप्रधानांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

PM Modi Birthday | पंतप्रधान मोदींचा 70 वा वाढदिवस, भाजपचा जल्लोष, राहुल गांधी ते नेपाळच्या पीएमकडून शुभेच्छा
भारतात बेरोजगारीचे प्रमाण कमी झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनादरम्यान, भारतात जूनमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 10.18 टक्के होते, ते आता नोव्हेंबरमध्ये 6.51 टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे.
| Updated on: Sep 17, 2020 | 9:01 AM
Share

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे (Prime Minister Narendra Modi Birthday). ते आज 70 वर्षांचे झाले. पंतप्रधानांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने सकाळपासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशातील अनेक नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहोचवत आहेत. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत (Prime Minister Narendra Modi Birthday).

पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते सेवा आठवडा साजरा करत आहेत.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यानी पंतप्रधान मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींसाठी चांगलं आरोग्य आणि प्रसन्नतेसाठी प्रार्थना केली आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही पंतप्रधानांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “मोदींच्या रुपात देशाला एक असं नेतृत्त्व मिळालं ज्यांनी लोक-कल्याणासाठी वंचित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलं आणि एका मजबूत भारताचा पाया रचला”, असं ट्वीट अमित शहा यांनी केलं.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी पंतप्रधानांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. “पंतप्रधान मोदी सतत गरीब आणि उपेक्षितांना सशक्त बनवण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहेत”, असं ट्वीट त्यांनी केलं.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही पंतप्रधानांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनीही नरेंद्र मोदींना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्रातील भापजचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पंतप्रधानांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनीही ट्वीट करत पंतप्रधानांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Prime Minister Narendra Modi Birthday

संबंधित बातम्या :

चीनची 10 हजार भारतीयांवर पाळत, आजी-माजी 5 पंतप्रधान, 12 मुख्यमंत्री, 350 खासदारांचा समावेश

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.