भारताकडून F-16 विमान पाडल्याचे पुरावे सादर

नवी दिल्ली : भारताच्या मिग-21 युद्धविमानाने पाकिस्तानचे एफ-16 युद्धविमानचं पाडल्याचे भारतीय वायूदलाने स्पष्ट केले आहे. आज (8 एप्रिल 2019) आयएएफने घेतलेल्या पत्रकार परिषदेत एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी ही माहिती दिली. त्यांनी यावेळी पुरावा म्हणून भारतीय रडारचे काही फोटोही सादर केले. दरम्यान 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने एफ-16 विमानाचा वापर केला होता. या विमानांवर […]

भारताकडून F-16 विमान पाडल्याचे पुरावे सादर
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:04 PM

नवी दिल्ली : भारताच्या मिग-21 युद्धविमानाने पाकिस्तानचे एफ-16 युद्धविमानचं पाडल्याचे भारतीय वायूदलाने स्पष्ट केले आहे. आज (8 एप्रिल 2019) आयएएफने घेतलेल्या पत्रकार परिषदेत एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी ही माहिती दिली. त्यांनी यावेळी पुरावा म्हणून भारतीय रडारचे काही फोटोही सादर केले. दरम्यान 27 फेब्रुवारीला पाकिस्तानने एफ-16 विमानाचा वापर केला होता. या विमानांवर कारवाई करताना भारतीय वायूसनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमानने एफ-16 ला पाडले होते.

एअर व्हाईस मार्शल कपूर म्हणाले, “27 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानी वायूसेनेकडून फक्त एफ-16 विमानाचा वापर करण्यात आला होता. भारताच्या वायूसेनेने कारवाई दरम्यान मिग-21 चा वापर करत एफ-16 पाडले होते. यामध्ये काही संशय नाही की, 27 फेब्रुवारीला 2 विमानांमध्ये टक्कर झाली होती. यामध्ये एक पाकिस्तानचे विमान होते, तर दुसरे आपले विमान होते. आम्ही इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर आणि रेडिओ ट्रांसक्रिप्टसच्या माध्यमातून विमानांची ओळख पटवली आहे. पुरावे म्हणून भारतीय वायू दलाने काही फोटोही सादर केले आहेत”. यावेळ त्यांनी आपल्याकडे काही भक्कम पुरावे असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही हे सार्वजनिक करु शकत नाही”, असेही नमूद केले.

पाकिस्तानच्या डीजी इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या (डीजी-आयएसपीआर) काही अधिकाऱ्यांनीही आयएएफच्या या वक्तव्याचे समर्थन केले आहे. डीजी-आयएसपीआरने एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, “त्यांच्याजवळ 2 पायलट आहेत. एकाला अटक केले आहे, तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे”.

पुलवामा हल्ला झाल्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांविरोधात रोष व्यक्त केला जात होता. यावेळी काही दिवसानंतर भारतीय वायूसेनेनेही पुलवामा हल्ल्याच्या बदल्यात पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बॉम्ब हल्ला केला. यामुळे भारत आणि पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच यावेळी भारतीय वायूसनेचा अधिकारी हवाई कारवाई करताना पाकिस्तानच्या हद्दीत पडला. यानंतर भारतातून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. भारतीय वायूसेनेचा हल्ला आणि एफ-16 विमान पाडलं यावर अनेकांनी आतापर्यंत प्रन्शचिन्ह उपस्थित केले आहेत. याच प्रश्नावर आज भारतीय वायूसेनेने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें