पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या

पुण्यात 43 वर्षीय रिक्षाचालकाने आपल्या मुलीची हत्या करुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नी सोडून गेल्यामुळे विवंचनेतून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे

पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीची हत्या करुन वडिलांची आत्महत्या

पुणे : पुण्यात पोटच्या मुलीची हत्या करुन बापाने आत्महत्या (Pune Father Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील सहकार नगर परिसरात राहणाऱ्या आशिष भोंगळेने आपल्या आठ वर्षांच्या चिमुरडीचा जीव घेतला, त्यानंतर स्वतःचं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

काशीनाथ पाटील नगरमध्ये राहणारा 43 वर्षीय आशिष रिक्षाचालक म्हणून काम करत होता. आशिषला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आशिष आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु होते. त्यामुळे पती-पत्नी वेगवेगळे राहत असून दोन्ही मुलांचा सांभाळ आशिषच करतो, मात्र मोठा मुलगा शिक्षणानिमित्त बाहेरगावी आहे.

आशिषने शनिवारी रात्री आई घरात नसल्याची संधी साधून आठ वर्षांच्या श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर गळफास घेऊन आशिषने आपलंही आयुष्य संपवलं. आशिषची आई घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

कौटुंबिक वादातून आशिषने टोकाचं पाऊल गाठल्याचं म्हटलं जात आहे. पत्नी सोडून गेल्यामुळे आशिष विवंचनेत होता, त्याच रागातून त्याने लेकीची हत्या करुन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे सहकार नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI