भवानी पेठेसह पाच हॉटस्पॉटमधील 20 हजार कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर होणार, पुण्याची वॉर्डनिहाय रुग्णसंख्या

एक आड एक घरातील रहिवाशांना किंवा एका घरातील काही सदस्यांना स्थलांतरित करण्याचं नियोजन असून त्यांची शाळा, मंगल कार्यालय, एसआरए इमारत, वसतिगृहात तात्पुरती सोय केली जाणार आहे (Pune Bhavani Peth Families to be migrated from corona hotspot)

भवानी पेठेसह पाच हॉटस्पॉटमधील 20 हजार कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर होणार, पुण्याची वॉर्डनिहाय रुग्णसंख्या
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 7:52 AM

पुणे : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. पाच क्षेत्रीय कार्यालयातील हॉटस्पॉटमधील गर्दी कमी करण्यावर पालिकेचा भर आहे. यासाठी किमान 20 हजार कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर केलं जाणार आहे. ‘कोरोना’चे केंद्रस्थान असलेल्या भवानी पेठेतील रुग्णसंख्या तब्बल 250 वर गेली आहे. पुणे जिल्ह्यात काल 84 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1,348 वर पोहोचली आहे. (Pune Bhavani Peth Families to be migrated from corona hotspot)

भवानी पेठ, शिवाजीनगर घोलेरोड, कसबा पेठ विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रोड आणि येरवडा धानोरी या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पाच क्षेत्रीय कार्यालयात रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या भागात जवळपास 72 हजार कुटुंब राहत असून त्यांची लोकसंख्या तब्बल साडेतीन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे इथल्या किमान 20 हजार कुटुंबांना तात्पुरतं हलवलं जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात साधारण एक लाखापर्यंत नागरिकांना स्थलांतरित केलं जाणार आहे. यानंतर गरज पडल्यास आणखी कुटुंबांना हलवलं जाण्याची शक्यता आहे. एक आड एक घरातील रहिवाशांना किंवा एका घरातील काही सदस्यांना स्थलांतरित करण्याचं नियोजन आहे.

या नागरिकांची शाळा, मंगल कार्यालय, एसआरए इमारत, वसतिगृहात तात्पुरती सोय केली जाणार आहे. इथे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत.

पुणे शहरात काल दिवसभरात 72 नवे रुग्ण सापडले असून तिघांचा कोरोनाने 3 बळी घेतला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाचे 75 बळी गेले असून 966 रुग्ण उपचार घेत आहेत.

पुणे शहरात 27 एप्रिलपर्यंत 1222 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1183 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

भवानी पेठेसह शिवाजीनगर घोलेरोड, कसबा पेठ विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रोड आणि येरवडा धानोरी या पाच वॉर्डमध्ये रुग्णसंख्या शंभरीपार गेली आहे.

ढोले पाटील रोड (21 नवे रुग्ण) , शिवाजीनगर – घोलेरोड (15), येरवडा – धानोरी (12), हडपसर – मुंढवा (9) या भागात कालच्या दिवसातही मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडले आहेत.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 4 (0) कोथरुड – बावधन –  2 (0) वारजे – कर्वेनगर – 9 (0) सिंहगड रोड –  11 (+1) शिवाजीनगर – घोलेरोड – 157 (+15) कसबा – विश्रामबाग वाडा – 133 (+2) धनकवडी – सहकारनगर –  62 (+1) भवानी पेठ – 250 (+5) (Pune Bhavani Peth Families to be migrated from corona hotspot) बिबवेवाडी – 33 (+1) ढोले पाटील रोड –  184 (+21) कोंढवा – येवलेवाडी – 16 (0) येरवडा – धानोरी – 139 (+12) नगर रोड – वडगाव शेरी – 30 (0) वानवडी – रामटेकडी – 58 (+2) हडपसर – मुंढवा –  41 (+9) पुण्याबाहेरील – 53 (+3)

(Pune Bhavani Peth Families to be migrated from corona hotspot)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.