AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात 69 प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठराविक दुकाने उघडणार, कोणत्या दिवशी कशाची विक्री?

पुण्याच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर आणखी काही व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. (Pune Shops outside containment zone to reopen during lockdown)

पुण्यात 69 प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठराविक दुकाने उघडणार, कोणत्या दिवशी कशाची विक्री?
| Updated on: May 13, 2020 | 8:15 AM
Share

पुणे : पुणे शहरात आजपासून 69 प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठराविक दुकाने उघडणार आहेत. पूर्वीच्या व्यवसायात आणखी काही नवीन व्यवसाय सुरु करण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. प्रत्येक वारानुसार वेगवेगळ्या दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. मुख्यत्वे इस्त्री, स्टेशनरी, फर्निचर, गृहोपयोगी साहित्याची दुकानं खुली होणार आहेत. (Pune Shops outside containment zone to reopen during lockdown)

पुण्याच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर आणखी काही व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला. काही वस्तू विक्रीसाठी दिवस निश्चित केले आहेत, त्या व्यवसायात वाढ करण्यात आलेली आहे. मनपाच्या आदेशानुसार ठरवून दिलेल्या वाराला तेच दुकान उघडे राहील, तर इतर दुकान बंद असतील. बाजारपेठेतील दुकानातील गर्दी टाळण्यासाठी अल्टरनेट पद्धतीने दुकानं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुकान सुरु राहणार असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. दुकान सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु राहील. ‌व्यवसायधारक आणि व्यवसाय करणारे कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर भागात राहणाऱ्या असावे. दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र द्यावे. दुकानांमध्ये कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्क आणि हातमोजे वापरावे. कर्मचाऱ्यांना कोणतेही आजाराचे लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. कर्मचाऱ्यांना वॉश बेसिन, सॅनीटायझर व्यवस्था करावी.
त्याचबरोबर दुकानाबाहेर पायऱ्या आणि इतर ठिकाणी सोडियम हायपो क्लोराईड फवारणी करावी. ग्राहक गेल्यानंतर काऊंटर सोडियम हायपो क्लोराईडनं पुसून घ्यावं. ग्राहकांना मास्क आवश्यक आणि सहा फुटाचे अंतर ठेवून बंधनकारक आहे.

कोणत्या दिवशी कशाची विक्री?

सोमवारी

इस्त्री-लॉन्ड्री, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी कच्चामाल पुरवठा करणारे व्यवसाय,

मंगळवारी

वाहन दुरुस्ती साहित्य विक्री, गृहोपयोगी साहित्य, तयार फर्निचर विक्री,

बुधवार

इस्त्री-लॉन्ड्री, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य निर्मिती करण्यासाठी पुरवठा करणारे (सोमवारप्रमाणे) अधिक फूटवेअर

हेही वाचा : ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी, घरपोच दारु मिळणार, राज्य सरकारचा निर्णय 

(Pune Shops outside containment zone to reopen during lockdown)

गुरुवारी

वाहन दुरुस्ती साहित्य विक्री, गृहोपयोगी वस्तू, तयार फर्निचर (मंगळवारप्रमाणे) अधिक स्टेशनरी दुकान

शुक्रवारी

इस्त्री-लॉन्ड्री, फूटवेअर, वैद्यकीय निर्मितीसाठी कच्चा पुरवठा करणारे व्यवसाय, (बुधवारप्रमाणे) अधिक बांधकाम साहित्य विक्री

शनिवारी

वाहन दुरुस्ती साहित्य विक्री, गृहोपयोगी वस्तू, इस्त्री-लॉन्ड्री, बांधकाम साहित्य, तयार फर्निचर विक्री

रविवारी

वाहन दुरुस्ती साहित्य विक्री, गृहोपयोगी वस्तू, स्टेशनरी, फूटवेअर आणि बांधकाम साहित्य विक्री

दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3 हजार 134 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 165 नवीन रुग्णांची भर पडली. पुणे शहरात आतापर्यंत 2 हजार 725, पिंपरी-चिंचवडमध्ये 173, तर पुणे ग्रामीणमध्ये 72 रुग्ण सापडले आहेत. तर कँटोमेन्ट आणि नगरपालिका हद्दीत 164 रुग्ण आहेत.

पुणे शहरात आतापर्यंत 149, तर उर्वरीत जिल्ह्यात 19 बळी गेले आहेत. पुणे शहरात 1205 जण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित जिल्ह्यात 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

(Pune Shops outside containment zone to reopen during lockdown)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.