कोरोना काळात डॉक्टर, नर्सचे हॉटेल बील कोटींच्या घरात, पुण्यातील हॉटेलकडून 86 लाख 72 हजारांचे बील सादर

| Updated on: Jun 15, 2020 | 6:45 PM

एका हॉटेलने तब्बल 86 लाख 71 हजार रुपयांचे बील पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत. (Pune covid warriors hotel bill 86 Lakhs) 

कोरोना काळात डॉक्टर, नर्सचे हॉटेल बील कोटींच्या घरात, पुण्यातील हॉटेलकडून 86 लाख 72 हजारांचे बील सादर
Follow us on

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून शेकडो डॉक्टर, नर्स आपल्या जीवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता अहोरात्र कोरोनाशी लढत आहेत. अनेक कोरोनाबाधितांवर उपचार करत आहे. या सरकारी आणि खासगी डॉक्टर, नर्सची प्रशासनाने रुग्णालयांच्या जवळील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. पण संबंधित हॉटेल मालकांनी यासाठी प्रशासनाला प्रति व्यक्ती दर दिवसाचे तब्बल 2 हजार रुपये आकारले आहेत. त्यानुसार एका हॉटेलने तब्बल 86 लाख 71 हजार रुपयांचे बील पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले आहेत. (Pune covid warriors hotel bill 86 Lakhs)

हॉटेलकडून या बीलाचे पैसे मिळण्यासाठी वारंवार विचारणा केली जात आहे. पण सध्या जिल्हा प्रशासनाने आपत्ती खात्यामध्ये असलेला निधी इतर अत्यावश्यक गोष्टींसाठी खर्च झाला आहे. त्यामुळे आता हॉटेलची कोट्यवधी रुपयांची बील कसे चुकवायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टर आणि नर्सच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली. या खाजगी डॉक्टरांनी आपली राहण्याची सोय हॉटेलमध्ये करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. त्यानुसार सुरुवातीला प्रशासनाने केवळ या नामांकित डॉक्टरची पंचतारांकित हॉटेलमध्ये सोय करण्यात आली.

त्यानंतर प्रशासनाने ससून रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ, निवासी डॉक्टरांसह कोरोनाची ड्युटी असणाऱ्या नर्सची देखील हॉटेलमध्ये सोय केली. सध्या एकूण सुमारे 500 ते 600 सरकारी आणि खाजगी डॉक्टर, नर्स यांची शहरातील काही हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.

यात पुणे शहरातील हॉटेल पवन, लेमन ट्री, आर्शिवाद हॉटेल, पंचरत्न, हॉटेल सागर ही हॉटेल अधिग्रहण केले आहेत. यात  ससून हॉस्पिटलसह सुमारे 80 खाजगी डॉक्टरची निवासाची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी एका हॉटेलने 86 लाख ७१ हजार रुपयांचे बील जिल्हा प्रशासनाला सादर केले.

त्यापैकी 33 लाख 52 हजार रुपयांचे बील सीएसआर निधीद्वारे अदा करण्यात आले. पण अद्याप 53 लाख 18 हजार रुपयाे बाकी आहे. यासाठी संबंधित हॉटेल मालकांकडून वारंवार प्रशासनाकडे तगादा लावला जात आहे. (Pune covid warriors hotel bill 86 Lakhs)

संबंधित बातम्या : 

इचलकरंजीत 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमांनी चिमुकलीला विहिरीत फेकलं

नागपूरची ‘लुटेरी दुल्हन’ गजाआड, उच्चशिक्षित बेरोजगारांना प्रीती दासचा लाखोंना गंडा