इचलकरंजीत 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमांनी चिमुकलीला विहिरीत फेकलं

इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या चंदूर येथे खाऊचं अमिष दाखवून एका 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला (Physical abuse and murder girl in Ichalkaranji).

इचलकरंजीत 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या, नराधमांनी चिमुकलीला विहिरीत फेकलं
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 5:40 PM

कोल्हापूर : इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या चंदूर येथे खाऊचं अमिष दाखवून एका 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला (Physical abuse and murder girl in Ichalkaranji). अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला विहिरीत तिची हत्या केली. याप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही घटना काल (रविवार, 14 जून) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित चिमुकलीला दोघा अल्पवयीन मुलांनी खाऊचे अमिश दाखवून सायंकाळी खांद्यावर उचलून परिसरातील निर्जन स्थळी नेले. तेथे तिच्यावर अत्याचार करुन तिला जवळच असलेल्या एका विहिरीत टाकण्यात आले. त्यानंतर सायंकाळी मुलगी सापडत नसल्याने नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध सुरु केली. त्यावेळी ही अल्पवयीन मुलेही त्यांच्यासोबत होते. मात्र, त्यांनी मुलीविषयी तिच्या घरच्यांना काहीही माहिती दिली नाही. तसेच त्यांना काही माहित नसल्याचंच भासवलं. हे दोन्ही मुले पीडित मुलीच्या शेजारीच राहणारे होते.

मुलीच्या घरच्यांनी आजूबाजूच्या परिसरातशोधाशोध केली मात्र मुलगी सापडली नाही. मुलीविषयी सोशल मीडियावर देखील माहिती देण्यात आली. यानंतर काही जागरुक नागरिकांनी मुलीचा मृतदेह विहिरीत पडल्याचे नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी तात्काळ मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. विशेष म्हणजे इतका गंभीर प्रकार होऊनही हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली नाही. त्यामुळे ही घटना दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही होत आहे.

हॉस्पिटल प्रशासनाने मुलीचं शवविच्छेदन करण्याचा सल्ला देण्याऐवजी तिच्यावर अंतिमसंस्कार करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. यानंतर नातेवाईकांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत दफन केले. दरम्यान, आज (15 जून) सकाळी हा प्रकार परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांना समजला. त्यामुळे नातेवाईक हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघड झालं. यानंतर शिवाजीनगर पोलिसांना तपास सुरु केला. त्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. एका आरोपीने पोलिसांना आणि नातेवाईकांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना या दोन्ही अल्पवयीन मुलांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी त्यांचा गुन्हा कबुल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये अल्पवयीन मुलगा संबंधित पीडित मुलीला दुकानातून खाऊ देऊन खांद्यावरुन घेऊन जातानाची घटना कैद झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये खळबळ माजली आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांना ही घटना कळताच धक्का बसला. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या झाल्याचं समजल्यानंतर आई-वडिलांनी पोलीस ठाण्यासमोरच आक्रोश केला.

पोलिसांनी पीडित मुलीचा दफन केलेला मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संपूर्ण पंचनामा करुन या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे. पोलिसांनी हॉस्पिटलच्या हलगर्जी डॉक्टरांवरही कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे. पोलिसांनी देखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. अधिक तपास डीवायएसपी गणेश बिरादार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे आणि कर्मचारी करत आहेत.

हेही वाचा :

‘वारणा कामगार सोसायटी’च्या संचालकाची हत्या, देवपूजा करताना पत्नीकडून डोक्यात हातोडा

नागपूरची ‘लुटेरी दुल्हन’ गजाआड, उच्चशिक्षित बेरोजगारांना प्रीती दासचा लाखोंना गंडा

मुलीच्या लग्नात अडथळा, आईकडून मुलीच्या प्रियकराचा खून

Physical abuse and murder girl in Ichalkaranji

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.