Janta Curfew | जनता कर्फ्यूदरम्यान आगाऊपणा, रस्त्यावर भटकणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जनता कर्फ्यूला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Janta Curfew | जनता कर्फ्यूदरम्यान आगाऊपणा, रस्त्यावर भटकणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या
Follow us
| Updated on: Mar 22, 2020 | 5:44 PM

पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Pune Janta Curfew) कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जनता कर्फ्यूला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, समाजातील काही टवाळखोर विनाकारण रस्त्यावर घुटमळत आहेत. या टवाळखोरांना पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा देत चांगलाच धडा शिकवला.

संपूर्ण देशात कोरोना विरोधात जनता कर्फ्यू पाळला जात आहे. देशासह राज्यातील मोठी शहरं ते ग्रामीण भागातही सर्व नागरिक हा कर्फ्यू त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून पाळत आहेत. राज्यातील प्रत्येक रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. कोरोनाला हरवायचं असेल, इतरांशी संपर्क टाळणे याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे, अत्यावश्यक सुविधा पुरवणारे सोडता इतर सर्व नागरिकांनी स्वत:ला एका दिवसासाठी क्वारंटाईन केलं आहे. मात्र, अशा परिस्थितीत नागरिकांच्या या प्रयत्नांना गालबोट लावण्याचे काम काही समाजकंटक करताना दिसत आहेत.

पुणे जिल्ह्यातीस आंबेगावच्या मंचर येथील पुणे-नाशिक महामार्गावरील एसटी बस स्थानकाजवळ काही टवाळखोर रस्त्यावर फिरत होते. या फिरणाऱ्या युवकांना प्रेमाने (Pune Janta Curfew) उठाबशा काढण्याची शिक्षा देत मंचर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. या शिक्षेमुळे अनेक टवाळखो रांना यातून बोध मिळणार आहे.

जनता कर्फ्यूला गालबोट, नाशकात दारुविक्री

पिंपळगाव बसवंत येथे सर्रास दारुविक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने जनता कर्फ्यूला गालबोट लागले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील पंजाब हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार सुरु आहे. स्थानिक पत्रकाराच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे समोर आलं. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत दारुविक्री बंदचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नाशकात सर्रास दारुविक्री सुरु आहे.  

आज जनता कर्फ्यू

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM narendra modi) देशातील नागरिकांना एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना (Mumbai Local Train Services Closed) टाळं असणार आहे.

संबंधित बातम्या :

Corona Death India | देशात ‘कोरोना’चा सहावा बळी, पाटणामध्ये एकाचा मृत्यू

Corona | महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी; राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वर

Corona | अखेर मुंबई लॉक डाऊन, लोकल आजपासून 31 मार्चपर्यंत पूर्ण बंद; देशातील रेल्वे वाहतूकही थांबली

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.