“घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे”, पुणे महापौरांचे आवाहन

घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे, पुणे महापौरांचे आवाहन

घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना (Pune Ganesh Visarjan) केले आहे.

सचिन पाटील

| Edited By:

Aug 11, 2020 | 8:16 AM

पुणे : घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीचे करावे, असं आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना (Pune Ganesh Visarjan) केले आहे. पुण्यात दरवर्षी पाच लाख मूर्तींचे विसर्जन हौदात होते (Pune Ganesh Visarjan).

यावेळी ‘घरगुती विसर्जनासाठी सोडियम बाय कार्बोनेट संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार. सार्वजनिक घाट आणि विसर्जन हौदाची सुविधा यावर्षी सेवक व्यस्ततेमुळे मनपाकडून केली जाणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्याही लक्षात घेता महापालिकेने विसर्जन घाट आणि हौदाची व्यवस्था न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘गणेशमूर्तीची खरेदी मंडळांनी आणि नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करावी. यावर्षी गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथावर परवानग्या दिल्या जाणार नाहीत.

गणेशमूर्ती विक्री परवानग्या क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर दिली जाईल. अशा परवानग्या मनपाच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाकडून देण्याचे नियोजन केले जात आहे.

उत्सव कालावधीत रस्ता आणि पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी मिळणार नाही, असंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीदिवसांपूर्वी वाढ होत होती, तर गेल्या दोन दिवसांत रुग्ण संख्येत घट झाली असून कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येवत वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या : 

Ganeshotsav 2020 | दगडूशेठ गणपतीची 127 वर्षांची परंपरा खंडित, यंदाचा गणेशोत्सव मुख्य मंदिरातच

Pune Corona : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा ‘मिशन झिरो’ उपक्रम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें