मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, पुणे पोलिसांचा इशारा

पुण्यात मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक करणार्‍यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला (Pune Morning Walk FIR filed) आहे.

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करणार, पुणे पोलिसांचा इशारा

पुणे : पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान (Pune Morning Walk FIR filed) मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहे. पुणे पोलिसांनी नाकाबंदी कडक केली आहे. विशेष म्हणजे मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर सर्व यंत्रणा अलर्ट (Pune Morning Walk FIR filed) झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉक करणार्‍यांवर कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना अनेकांना पोलिसांनी वारंवार विनंती आणि आवाहन केलं आहे. मात्र तरीही अनेक जण ऐकत नसल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

पुण्यात मोकाट फिरणाऱ्यांवर थेट पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आता मोकाट फिरणाऱ्यांची वाहन जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

तसेच पुणे शहरात आतापर्यंत 200 हून अधिक वाहनंही जप्त केली आहेत. त्याचबरोबर कलम 188 कलमांतर्गत जवळपास 850 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात पहिला बळी 

आज (30 मार्च) पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोरोनाबाधित 52 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे.

पुण्यात आज मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णाला विविध व्याधी होत्या. त्यामध्ये त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात पहिला बळी गेल्याने पुणेकरांसाठी ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत (Pune Morning Walk FIR filed) आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च

संबंधित बातम्या : 

पुण्यात मोकाट फिरणाऱ्या 300 जणांवर गुन्हा दाखल, नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर

एक-दोन नव्हे, तब्बल पाच वर्षांसाठी वीज दरात मोठी कपात

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI