पुण्यात एका दिवसात ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण, चार वॉर्डमध्ये शंभरीपार, कोणत्या प्रभागात किती?

पुण्यात एका दिवसात 'कोरोना'चे 104 नवे रुग्ण, चार वॉर्डमध्ये शंभरीपार, कोणत्या प्रभागात किती?

हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सोशल डिस्टन्सला हरताळ फासला जात आहे. भवानी पेठेतील रुग्णसंख्या एका दिवसात 16 ने वाढल्याने इथे आता 187 रुग्ण आहेत. (Pune Maximum Corona Patients in a day)

अनिश बेंद्रे

|

Apr 24, 2020 | 7:57 AM

पुणे : पुण्यात काल दिवसभरात (23 एप्रिल) ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या सव्वा महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात शंभरहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 876 वर गेली आहे. (Pune Maximum Corona Patients in a day) राज्यात काल तब्बल 778 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 427 वर गेली आहे.

पुण्यात कालच्या दिवसात ‘कोरोना’मुळे चौघे रुग्ण दगावल्याने एकूण ‘कोरोना’बळींचा आकडा 60 वर गेला आहे. पुण्यात 687 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर 130 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 36 कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती गंभीर असून यापैकी 25 जण ससून रुग्णालयात आहेत.

दरम्यान, पुणे शहरात 23 एप्रिलपर्यंत 881 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 853 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

हेही वाचा : मुंबईत 8 वॉर्डमध्ये 200 हून अधिक रुग्ण, कोणत्या वॉर्डत किती?

भवानी पेठेतील रुग्णसंख्या पुन्हा एका दिवसात 16 ने वाढली आहे. इथे आता 187 रुग्ण आहेत. हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सोशल डिस्टन्सला हरताळ फासला जात आहे. अंतर्गत गल्लीबोळात नागरिकांची ये-जा सुरुच आहे. नागरिकांना गांभीर्य नसल्यानं धोका वाढण्याची भीती आहे. सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नागरिकांची अपमानास्पद वागणूक मिळत आहे.

दुसरीकडे, कसबा विश्रामबाग वाडा आणि ढोले पाटील रोड भागापाठोपाठ येरवडा-धानोरीतील रुग्णसंख्याही शंभरीपार गेली आहे. तर शिवाजीनगर-घोले रोड भागात 90 पेक्षा अधिक रुग्ण आहेत.

येरवडा-धानोरी (19 नवे रुग्ण), भवानी पेठ (16), शिवाजीनगर-घोलेरोड (13), ढोले पाटील रोड (12), वानवडी – रामटेकडी (9) या भागात एका दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 3 (+1) कोथरुड – बावधन – 1 (0) वारजे – कर्वेनगर –9 (0) सिंहगड रोड – 10 (+1) शिवाजीनगर – घोलेरोड – 90 (+13) कसबा – विश्रामबाग वाडा –114 (+3) धनकवडी – सहकारनगर – 45 (+2) भवानी पेठ – 187 (+16) बिबवेवाडी – 24 (0) ढोले पाटील रोड – 122 (+12) कोंढवा – येवलेवाडी – 12 (0) येरवडा – धानोरी – 101 (+19) नगर रोड – वडगाव शेरी – 21 (+3) वानवडी – रामटेकडी – 43 (+9) हडपसर – मुंढवा – 28 (+2) पुण्याबाहेरील – 41 (+2)

(Pune Maximum Corona Patients in a day)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें