काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला; राम शिंदे यांचा घरचा आहेर

राम शिंदे यांनी काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा 'खेळ' केला आहे, असे वक्तव्य केले. (Ram Shinde criticises BJP, congress on dhangar aarakshan)

काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा 'खेळ' केला; राम शिंदे यांचा घरचा आहेर

 

पुणे : राज्यात मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन्ही समाजाकडून राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे काढले जात आहेत. अशातच काँग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला आहे, असे म्हणत माजी मंत्री राम शिंदे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला. (Ram Shinde criticises bjp, congress on dhangar aarakshan)

धनगर आरक्षणावर विसृत चर्चा करण्यासाठी राम शिंदे आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यात बैठक होणार होती. काही कारणास्तव उदयनराजे येऊ न शकल्याने ही नियोजित बैठक रद्द झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना राम कदम यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, की “विरोधात असलं प्रत्येकजण धनगर आरक्षण देऊ म्हणतो. पण सत्तेत आल्यानंतर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही. परिणामी आरक्षणाचा प्रश्न जिथे आहे तिथेच राहतो. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा खेळ केला.”

पुढे बोलताना राम शिंदे यांनी भाजपसहित सर्व पक्षांवर टीका केली. ते म्हणाले, की “भाजपा, काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या पक्षांनी धनगर आरक्षणाबाबत सोयीची भूमिका घेतली आहे. आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.” तसेच, प्रत्येकाने वैयक्तिक स्वार्थ आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आरक्षणाकडे पाहायला हवे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण हा राज्याचा प्रश्न असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच, आरक्षणाचा प्रश्न उदयनराजे यांना केंद्राकडून कशाला सोडवायला सांगता, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला होता. असे असले तरी, राम शिंदे मात्र धनगर समाजाला आरक्षण मिळण्याकरीता खासदार उदयनराजे यांनाच साकडे घालणार आहेत. राम शिंदे उदयनराजे यांच्याशी विसृत चर्चा करणार आहेत.

राम शिंदे-उदयनराजे भोसले यांची भेट हुकली

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राम शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात चर्चा होणार होती. पण ऐन वेळी उदयनराजे यांनी काही कारणास्तव बैठकीला येऊ न शकल्याचे कळवले. त्यामुळे ही नियोजित बौठक रद्द झाली. उदयनराजे हे राम शिंदे यांना त्यांच्या एका परिचिताच्या घरी भेटण्यास येणार होते. मात्र, अर्ध्या वाटेतून उदयनराजे यांनी यू टर्न घेतल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षणाची ओवाळणी द्या, बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर बहिणीचा ठिय्या

Dhangar Reservation | आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात धनगर समाजाची गोलमेज परिषद

“लढून मरावं, मरुन जगावं, हेच आम्हाला ठावं”, मराठा आरक्षणावर संभाजीराजेंचं युवकांना आत्महत्या न करण्याचं आवाहन

(Ram Shinde criticises BJP, congress on dhangar aarakshan)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI