रितेश, नागराज आणि अजय-अतुल, छत्रपती शिवरायांची महागाथा रुपेरी पडद्यावर

रितेश देशमुख, नागराज मंजुळे आणि अजय-अतुल हे 'शिवाजी', 'राजा शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी' अशी चित्रपटत्रयी प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत

रितेश, नागराज आणि अजय-अतुल, छत्रपती शिवरायांची महागाथा रुपेरी पडद्यावर

मुंबई : शिवजयंतीचं निमित्त साधत अभिनेता रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती टीम या सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन आणि अजय-अतुल यांचं संगीत या ‘शिवत्रयी’ सीरिजला लाभणार (Riteish Deshmukh Shivaji Maharaj Movie) आहे.

शिवरायांच्या आयुष्यावर आधारित तीन सिनेमांची निर्मिती केली जाणार आहे. ‘शिवाजी’, ‘राजा शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी’ अशी चित्रपटत्रयी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात असलं, तरी खुद्द रितेश हे शिवधनुष्य पेलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून होती. शिवजयंतीनिमत्त या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

‘शिवत्रयी’मधील पहिला सिनेमा 2021 मध्ये प्रदर्शित होईल. रितेश देशमुख, अजय- अतुल आणि नागराज मंजुळे ही जबरदस्त टीम छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आणणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Riteish Deshmukh Shivaji Maharaj Movie

Published On - 2:48 pm, Wed, 19 February 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI