AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीला गाडीवर फिरवायचं आहे, भाच्याकडून मावशीचे दागिने लंपास

प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी तरुणाने आपल्याच मावशीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना कोल्हापूरच्या कालगमध्ये घडली.

प्रेयसीला गाडीवर फिरवायचं आहे, भाच्याकडून मावशीचे दागिने लंपास
| Updated on: Nov 09, 2020 | 10:14 AM
Share

कोल्हापूर : प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी तरुणाने आपल्याच मावशीच्या दागिन्यांवर डल्ला (Robbery At Aunts House) मारल्याची घटना कोल्हापूरच्या कालगमध्ये घडली. पोलिसांनी अवघ्या चार तासातच या तरुणाच्या मुसक्या कागल आवळल्या. चोरी केलेले दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला (Robbery At Aunts House).

संशयित 20 वर्षीय तरुण वंदूर येथील आपल्या मावशीकडे नेहमी ये-जा करीत असे. मावशी सरिता जाधव ही दिवसभर शेती कामासाठी घरा बाहेर असते. तिने घरात असलेले एक लाख 92 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम वीस हजार रुपये पिशवीमध्ये गुंडाळून ते गव्हाच्या पोत्यात कोंबून ठेवले होते. तरुणाने ते पाहिले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास सरिता शेतीकामासाठी कुलूप लावून निघून गेली.

हा तरुण मामाच्या घराकडे गेला. तिथून तो परत मावशीच्या घरी आला. कुलूप काढून त्यातील दागिने आणि रक्कम चोरले, त्यानंतर चोरीचा बनाव करण्यासाठी कुलूप मोडले. तेथून तो मामाच्या मुलाला घेऊन कागलमध्ये फिरायला आला. नंतर तो परत मावशीच्या घरी गेला. मावशी पाच वाजता कामावरुन आली त्यावेळी हा चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर ही माहिती पोलिसांना फोनवरुन कळवण्यात आली. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निखील कर्चे विजय पाटील रोहन वाकरेकर रवींद्र साळुंखे ही सर्व टीम वंदूरमध्ये जावून दाखल झाली.

चोरी झालेल्या घरातील परिवार, नातेवाईक आणि शेजारी यांना एकत्र करुन पोलिसांनी आरोपी तुमच्यातील असल्याचे सांगितले. मात्र, कोणाचे नाव घ्यायचे या उद्देशाने त्यांनी काहीही माहिती सांगितली नाही. त्यानंतर ते परत पोलीस स्टेशनला आले. यावेळी मावशीसोबत हा तरुणही होता. पोलीस उपनिरीक्षक निखिल कर्चे यांच्या चाणाक्ष बुद्धिचातुर्याने त्यांची नजर या तरुणावर होतीच तो मावशीच्या मागे लपत असल्याचं त्यांच्या लक्षात आले. इथेच कर्चे यांचा संशय बळावला (Robbery At Aunts House).

दरम्यान, मी फायनान्स कंपनीत कामाला लागलो आहे, मिळालेला बोनस आणि दागिने आपल्याकडे ठेवा, असं सांगत तरुणाने आपल्या मित्रांकडे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम दिली होती. रात्री वाजण्याच्या सुमारास संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला गाडीतून कागलला आणत असताना त्याच्या मोबाईलवर त्याच्या मित्राचा फोन आला. दिलेले दागिने अडीच तोळ्याचे आहेत, हे कर्चे यांच्या कानावर पडले. त्यांनी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला.

दागिने ठेवलेल्या मित्राकडे पोलीस पोहोचले. त्याच्या मित्राकडे असलेले मंगळसूत्र, सोन्याची चेन, कानातील झुमके, नेकलेस असे सुमारे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम रुपये वीस हजार असा एकूण 1 लाख 92 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला.

या तरुणाचे एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशी लग्न करायचे आहे. तिला खूश करण्यासाठी सांगलीतील जुनी मोटरसायकल घ्यायची आहे. ती घेऊन तिला फेरफटका मारण्यासाठी जाणार होतो. म्हणून माझ्याच मावशीच्या घरातील चोरी केल्याचे त्याने कबूल केले. केवळ चार ते पाच तासातच आरोपी आणि सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. तर केवळ प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी या तरुणाला आता पोलीस जेलची हवा खावी लागणार आहे.

Robbery At Aunts House

संबंधित बातम्या :

दाटीवाटीच्या लोकवस्तीत बिस्कीटच्या दुकानाआड फटाक्यांची विक्री, दीड लाखांचे फटाके जप्त

भिगवणमध्ये 150 किलो गांजा जप्त, पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.