वाहनातील ऑईल गळत असल्याचा बनाव, बँकेसमोरुनच 25 लाखांची रोकड लंपास

वाहनाचे ऑईल गळत असल्याचे सांगत लक्ष विचलित करुन 25 लाख रुपयांची बॅग लंपास केल्याची घटना घडली.

वाहनातील ऑईल गळत असल्याचा बनाव, बँकेसमोरुनच 25 लाखांची रोकड लंपास

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याच्या खामगावात एचडीएफसी बँकेसमोर वाहनाचे ऑईल गळत (Robbery In Khamgaon) असल्याचे सांगत लक्ष विचलित करुन 25 लाख रुपयांची बॅग लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकारणारतील तीन चोरटे दुचाकीवरुन बॅग घेऊन जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे, त्याआधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत (Robbery In Khamgaon).

खामगाव येथील जय किसान खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष भागदेवानी हे काल दुपारी महावीर मार्केटजवळील एचडीएफसी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून 25 लाख रुपये काढून आपली बॅग बँकेच्या बाहेर उभ्या असलेल्या गाडीत ठेवली आणि वाहनात बसले. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर एक अज्ञात व्यक्ती आली आणि म्हणाली, तुमच्या गाडीचे ऑईल गळत आहे. त्यामुळे आशिष हे गाडीचे ऑईल पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरले.

ऑईल पाहत असताना दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या गाडीमधील बॅग काढून घेतली. आशिष गाडीत बसल्यानंतर मागील सीटवर ठेवलेली बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. यावेळी खामगाव पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी एचडीएफसी बँकेतील तसेच परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यात अज्ञात चोरटे बॅग घेऊन जाताना दिसले. त्याआधारे पोलीस शोध घेत आहेत.

Robbery In Khamgaon

संबंधित बातम्या :

कचरा टाकण्यावरुन वाद, स्वच्छता मार्शल महिलेचा एका व्यक्तीवर टोकदार चावीने वार, डोंबिवलीत घटना

काम चोरी करणे, महिन्याला पगार, मालक बिहारमध्ये, चोर नागपुरात!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI