चंद्राचा दरवाजा ठोठावणारा शेतकऱ्याचा मुलगा, ISRO प्रमुख के सिवन यांचा प्रेरणादायी प्रवास

भारताचा रॉकेट मॅन अशी ओळख असलेल्या के सिवन यांचं शालेय शिक्षण तामिळ भाषेत झालं. मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर एकामागून एक टप्पे त्यांनी पार केले आणि आज 'इस्रो'च्या प्रमुखपदी ते विराजमान झाले आहेत.

चंद्राचा दरवाजा ठोठावणारा शेतकऱ्याचा मुलगा, ISRO प्रमुख के सिवन यांचा प्रेरणादायी प्रवास
Follow us
| Updated on: Sep 07, 2019 | 3:22 PM

मुंबई : ‘चंद्रयान 2’ (Chandrayaan 2) मोहिमेचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करणाऱ्या ‘इस्रो’चे (Indian Space Research Organisation- ISRO) प्रमुख म्हणून के सिवन (K Sivan) यांची ओळख जगाला झाली. तामिळनाडूतील सरकारी शाळेत शिकलेला शेतकऱ्याचा मुलगा ते ‘इस्रो’चं प्रमुखपद असा थक्क करणारा प्रवास कैलासवादीवू सिवन (Kailasavadivoo Sivan) यांनी केला आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’चे ते अध्यक्ष, तर अवकाश विभागाचे ते सचिव आहेत. विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते माजी संचालक आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी क्रायोजेनिक इंजिनचा (cryogenic engines) विकास करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना ‘रॉकेट मॅन’ (Rocket Man) असंही संबोधलं जातं.

सर्वसामान्य कुटुंबातला अभ्यासू मुलगा

के सिवन यांचा जन्म 14 एप्रिल 1957 रोजी तामिळनाडूमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. कैलासवादीवू हे सिवन कुटुंबातील पहिलेच पदवीधर होते. ते लहानपणापासूनच अभ्यासू आणि मेहनती असल्याचं त्यांचे काका सांगतात. सिवन कधीच शिकवणी किंवा क्लासेसना गेले नव्हते.

तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील तारक्कनविलाई या आपल्या मूळ गावातील सरकारी शाळेत सिवन यांचं शिक्षण झालं. विशेष म्हणजे त्यांचं शालेय शिक्षण हे तामिळ माध्यमातूनच झालं. त्यानंतर नागरकोईलमधल्या एसटी हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली.

1980 मध्ये ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून त्यांनी एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तर बंगळुरुतील आयआयएससीमधून एअरोस्पेस इंजिनिअरिंग विषयात 1982 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) मिळवली. आयआयटी बॉम्बेमधून 2007 मध्ये त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली.

शिरपेचातील मानाचे तुरे

पोलर सॅटेलाईट लाँच वेहिकल (Polar Satellite Launch Vehicle – PSLV) प्रकल्पासाठी 1982 मध्ये के सिवन यांनी ‘इस्रो’ जॉईन केलं. या प्रकल्पात नियोजन, डिझाइन, एकत्रीकरण आणि विश्लेषण करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. इस्रोमधील कार्यकाळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलल्या.

सिवन यांनी विकसित केलेल्या एका स्ट्रॅटेजीमुळे हवामान किंवा वाऱ्याची स्थिती कशीही असताना, कोणत्याही दिवशी रॉकेट लाँचिंग शक्य होतं. भारताने एकाच पीएसएलव्हीतून 104 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्याचा विक्रम फेब्रुवारी 2017 मध्ये रचला होता. या मोहिमेचे ते प्रमुख होते. सिवन यांच्या नावे विविध जर्नल्समध्ये असंख्य संशोधनं प्रकाशित झाली आहेत.

आणि सिवन यांचा बांध फुटला…

चंद्रयान 2 मोहिमेच्या विक्रम लँडरसोबत संपर्क तुटल्यानंतर ‘इस्रो’तील सर्वच शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला होता. इतक्या वर्षांची मेहनत आणि स्वप्न चंद्राच्या उंबरठ्यापाशी पोहचून धूसर झाल्याने सिवन यांनाही गहिवरुन आलं. सिवन यांना अनावर झालेला हा हुंदका त्यांच्या सच्चेपणाची साक्ष देतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

संबंधित बातम्या :

संपर्क तुटला, संकल्प नाही, मोदींचं शास्त्रज्ञांना मनोबल, गळाभेट घेताना ‘इस्रो’ प्रमुखांचा बांध फुटला

Chandrayaan 2 : चंद्रापासून अवघं 2.1 किमी अंतर, विक्रम लँडर संपर्काबाहेर

चंद्रयान 2 : यश मिळालं तर आपलं, अपयश आलं तरीही आपलंच, इस्रोच्या 2 रॉकेट वुमनचा देशाला अभिमान

‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा

Chandrayaan-2 चंद्राच्या उंबरठ्यावर, मध्यरात्री ‘चंद्रयान 2’चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, भारत ‘विक्रम’ रचणार

Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?

Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं 

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.